आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये प्रथमच प्लास्टिक सर्जरी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये प्रथमच प्लास्टिक सर्जरी

कोपरगाव/वेबटीम:-   कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मलिक हॉस्पिटल आणि साईबाबा मेडिकल हब हॉस्पिटलमध्ये रविवार २० फेब्रुवारी रोजी सर्जर...

कोपरगाव/वेबटीम:- 


कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मलिक हॉस्पिटल आणि साईबाबा मेडिकल हब हॉस्पिटलमध्ये रविवार २० फेब्रुवारी रोजी सर्जरी तज्ञ आदित्य दमानिया यांनी बीड येथील मीना शेख या मुलीच्या हाताची प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. कोपरगाव, शिर्डी या दोन शहरांत प्रथमच प्लास्टिक सर्जरी आत्मा मलिक हॉस्पिटल व साईबाबा मेडिकल हब या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झाली आहे.या रुग्णांची प्लास्टिक सर्जरी महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करण्यात आली. आता या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचे ही उपचार सुरू करण्यात आले आहे. पहिले प्लास्टिक सर्जरी व कॅन्सर च्या उपचारासाठी  अहमदनगर, पुणे येथे जावे लागत होते.जाण्यायेण्याचा खर्च खूप लागत होता.ही बाब लक्षात घेत आत्मा मलिक हॉस्पिटल आणि साईबाबा मेडिकल हब या हॉस्पिटलचे चेअरमन सुमनजी यांनी नव्याने कॅन्सर युनिट सुरू करण्यात आले. आता रुग्णांना दुसऱ्या शहरात जाण्याची गरज नाही. आता आपल्या शहरात या सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या आहे.या हॉस्पिटलमध्ये महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना सुरू झाली आहे. बाहेरील जिल्यातील रुग्ण या योजनेचा लाभ सुसज्य आणि सुखसुविधा उपयुक्त आत्मा मलिक हॉस्पिटल व साईबाब मेडिकल हब या हॉस्पिटलमध्ये लाभ घेत आहे. जर एखादे रुग्ण या दोन्ही योजनेत बसत नसेल तर साईधाम फाउंडेशन मार्फत मोफत केले जाते.मागील  महिन्यात साई धाम फाउंडेशन मार्फत ५ गरीब रुग्णांचे उपचार करण्यात आले. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आत्मा मलिक हॉस्पिटल आणि साईबाबा मेडिकल हब हॉस्पिटलशी संपर्क साधावा असे आवाहन हॉस्पिटलचे चेअरमन सुमनजी यांनी केले आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत