राहुरीत गोवंश जनावरांची ४ हजार किलो कातडी जप्त - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत गोवंश जनावरांची ४ हजार किलो कातडी जप्त

राहुरी(वेबटीम) नगर मनमाड मार्गावर राहुरी खुर्द शिवारात एका आयशर  टेम्पोमधून गोवंशीय जनावरांच्या कातडीची अवैध वाहतूक होत असल्याची पोलीस उपअधी...

राहुरी(वेबटीम)

नगर मनमाड मार्गावर राहुरी खुर्द शिवारात एका आयशर  टेम्पोमधून गोवंशीय जनावरांच्या कातडीची अवैध वाहतूक होत असल्याची पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाला मिळताच पथकाने छापा टाकून ४ हजार किलो गोवंशीय जनावराची कातडी व एक टेम्पो जप्त केला आहे.


श्रीरामपूर ग्रामीण विभागाचे विभागीय पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने सापळा रचून राहुरी खुर्द येथे एका आयशर टेम्पो मधून सुमारे २ लाख ४० हजार रुपये किमतीचे ४ हजार किलो गोवंश जनावरांची कातडी तसेच ६ लाख रुपये किंमतीचाआयशर टेम्पो जप्त केला आहे.

याप्रकरणी बबलू रऊफ कुरेशी, हारून गणी कुरेशी(श्रीरामपूर)  यांच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात पो. कॉ. नितीन शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उपनिरीक्षक सज्जन नारहेडा, एएसआय राजेंद्र आरोळे, पो.कॉ. नितीन शिरसाठ आदींनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत