सात्रळ/वेबटीम:- गेल्या नोव्हेंबर मध्ये झालेल्या महत्वाची नेट परीक्षेचा निकाल नुकताच लागलेला असून या परीक्षेत प्रीती विकास ब्राह्मणे...
सात्रळ/वेबटीम:-
गेल्या नोव्हेंबर मध्ये झालेल्या महत्वाची नेट परीक्षेचा निकाल नुकताच लागलेला असून या परीक्षेत प्रीती विकास ब्राह्मणे निकाळे या उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. त्या कॉम्पुटर सायन्स अँड अँप्लिकेशन हा विषय घेऊन नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.देशभरातून या कॉम्पुटर सायन्स या विषयासाठी एकूण 61056 परीक्षार्थीनी अर्ज करून यातून 30337 परीक्षार्थी नी प्रत्यक्षात परीक्षा दीली त्यापैकी फक्त 2126 जण उत्तीर्ण झाले असून त्यापैकी प्रीती ब्राह्मणे निकाळे या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सात्रळ सोनगाव पंचक्रोशी तुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.प्रीती ब्राह्मणे निकाळे या राहाता येथील उत्तम निकाळे यांची कन्या व सोनगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वसंतराव ब्राह्मणे यांच्या स्नुषा आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत