कोपरगाव/प्रतिनिधी:- कोपरगाव नगरपरिषदेचे उपकार्यकारी अधिकारी सुनील गोरडे यांना मारहाण करून कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयात केलेल्या तोडफोडी...
कोपरगाव/प्रतिनिधी:-
कोपरगाव नगरपरिषदेचे उपकार्यकारी अधिकारी सुनील गोरडे यांना मारहाण करून कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयात केलेल्या तोडफोडीतून माजी उपनगराध्यक्ष योगेश तुलसीदास बागुल व नगरसेवक कैलास व्दारकानाथ जाधव यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यांना सात वर्ष अपात्र करावे अशी मागणी सुनील फंड यांनी केलेली आहे.त्याबाबत येत्या ३मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली असून योगेश बागुल व कैलास जाधव यांना निवडणुकीसाठी सात वर्ष अपात्र ठरवणार का?याबाबत फैसला होणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव नगरपरिषदेचे उपकार्यकारी अधिकारी सुनील गोरडे यांनी शासनाच्या नियमानुसार कोपरगाव शहरातील अतिक्रमणे नियमाप्रमाणे काढली होती.त्याचा राग धरून माजी उपनगराध्यक्ष योगेश तुलसीदास बागुल व नगरसेवक कैलास व्दारकानाथ जाधव यांनी याचा राग धरून उपकार्यकारी अधिकारी सुनील गोरडे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली होती व कोपरगाव नगरपरिषदेचे कार्यालयातील साहित्याची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.त्याबाबत महाराष्ट्र नगरपरिषदा नगर पंचायत व औद्योगिक नगरी १९६५ चे कलम ४४ नुसार कायदेशीर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
मात्र उपनगराध्यक्ष योगेश तुलसीदास बागुल व नगरसेवक कैलास व्दारकानाथ जाधव यांच्यावर योग्य ती कारवाई न झाल्यामुळे महाराष्ट्र नगरपरिषदा नगर पंचायत व औद्योगिक नगरी १९६५ चे कलम ४४वर नाराज होवून अशा विघातक प्रवृत्तींना चाप बसावा यासाठी माजी उपनगराध्यक्ष योगेश तुलसीदास बागुल व नगरसेवक कैलास व्दारकानाथ जाधव यांच्यावर सात वर्षासाठी अपात्रतेची कारवाई करावी अशा आशयाचे अपील जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्याकडे केली होती.त्याबाबत ३मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.त्यामुळे माजी नगराध्यक्ष योगेश बागुल व नगरसेवक कैलास जाधव सात वर्षासाठी अपात्र ठरतील का?याकडे कोपरगाव शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत