राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- साई आदर्श मल्टीस्टेट सारख्या संस्था आपल्या कर्तृत्वातून समाज सेवेचे व्रत हाती घेऊन कार्य करत असल्याने समाजातील अर्थ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-
साई आदर्श मल्टीस्टेट सारख्या संस्था आपल्या कर्तृत्वातून समाज सेवेचे व्रत हाती घेऊन कार्य करत असल्याने समाजातील अर्थकारणाची घडी अजून सुस्थितीत आहे या संस्था सामान्यांसाठी आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन समाज प्रबोधनकार ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले आहे.
यावेळी संचालक वीष्णुपंत गीते, कीशोर थोरात, धीरज कपाळे, रमेश चोरडीया, साई अँग्रोचे चेअरमन वेदांत कपाळे, बाळासाहेब मुसमाडे, सोमनाथ थोरात, कीरण महाराज शेटे, बोरचाटे व कर्मचारी वृंद आदी ऊपस्थीत होते. याबाबत माहिती अशी की, समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी नुकतीच साई आदर्श मल्टीस्टेट च्या राहुरी फॅक्टरी येथील मुख्य शाखेस भेट दिली यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी इंदुरीकर यांचा संस्थेच्या वतीने सन्मान केला.
यावेळी कपाळे यांनी इंदुरीकर यांना आपल्या संस्थेच्या कामकाजाविषयी सविस्तर माहिती देत संस्थेचा लेखाजोखा त्यांच्यासमोर मांडला.
यानंतर बोलताना इंदुरीकर यांनी सांगितले की, साई आदर्श मल्टीस्टेट च्या माध्यमातून शिवाजीराव कपाळे हे सर्वसामान्य माणसाला आधार देण्याचे काम करत आहे या संस्थेने केलेली भरभराट हा त्यांच्यावर असलेल्या विश्वासाचे व पारदर्शक कारभाराचे प्रतीक आहे. या विश्वासाच्या जोरावर या संस्थेने अल्पकाळात विकासाचा एवढा मोठा पल्ला गाठला आहे असे काम सर्वच आर्थिक संस्थांनी करून सामान्यांना आधार देण्याचे काम करावे. असे आवाहन इंदुरीकर यांनी यावेळी केले. सुत्रसंचालन विजय भोसले यांनी तर आभार पारस नहार यांनी मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत