राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील शिवबा प्रतिष्ठान च्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आज सकाळी तनपुरे कारखा...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील शिवबा प्रतिष्ठान च्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
आज सकाळी तनपुरे कारखाना कार्यस्थळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास माजी सैनिक यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांची महाआरती संपन्न झाली. प्रसंगी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.
त्याचप्रमाणे राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलचे विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
यावेळी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगरसेवक आदिनाथ कराळे, प्रशांत काळे, अमोल वाकचौरे ,बाळासाहेब आढाव ,आरपीआय जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे मुख्याध्यापक श्री.जाधव सर,पत्रकार गणेश विघे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली.
शिवबा प्रतिष्ठानने माजी सैनिकांच्या हस्ते अभिवादन करून अनोख्य पद्धतीने शिवजयंती साजरी केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत