कोपरगाव/वेबटीम:- अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या कोपरगाव पीपल्स बँकेने बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांना 15 ℅ पगार वाढ देण्याचा करार अहमदनगर ...
कोपरगाव/वेबटीम:-
अहमदनगर जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या कोपरगाव पीपल्स बँकेने बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांना 15 ℅ पगार वाढ देण्याचा करार अहमदनगर जिल्हा बँक कर्मचारी युनियन व पीपल्स बँक यांच्यामध्ये 29 तारखेला करण्यात आला
यावेळी बँकेचे चेअरमन श्री सत्येन मुंदडा तसेच ज्येष्ठ संचालक श्री कैलासशेठ ठोळे ,श्री धरमकुमार बागरेचा, श्री सूनील बंब, श्री सुनील कंगले, श्री कल्पेश शहा , एडवोकेट श्री संजय भोकरे व बँकेचे जनरल मॅनेजर श्री दीपक एकबोटे व अहमदनगर जिल्हा युनियनचे जॉइंट सेक्रेटरी श्री प्रदीप नवले तसेच बँकेचे सेवक प्रतिनिधी श्री वीरेश पैठणकर श्री अशोक पापडीवाल व सर्व कर्मचारी उपस्थित होते
यावेळी कर्मचाऱ्यांच्या वतीने बँकेच्या संचालकांचा सत्कार करण्यात आला
कर्मचाऱ्यांना 15 टक्के पगारवाढ देणारी नगर जिल्ह्यातील आपली एकमेव बँक आहे असे श्री प्रदीप नवले यांनी सांगितले
संचालक कल्पेश शहा यांनी सर्व कर्मचाऱ्यांनी नवीन खातेदार व कर्जदार आणावे अशा सूचना केल्या
संचालक धरमशेठ बागरेचा यांनी व्यवसाय वृद्धी करण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले
संचालक कैलासशेठ ठोळे यांनी सध्याचे बाजारातील आर्थिक परिस्थिती व बँकिंग क्षेत्रातील स्पर्धात्मक परिस्थिती याची माहिती कर्मचाऱ्यांना अवगत करून दिली व आपल्या बँकेची प्रगती करण्यासाठी भरपूर मेहनत घेण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले व कर्मचाऱ्यांना बाबत बँकेचे मॅनेजमेंट नेहमीच सकारात्मक राहिले आहे असे सांगितले
संचालक सुनीलभाऊ कंगले यांनी कर्मचाऱ्यांना खातेदारांचे केवायसी अपडेट करण्यासंबंधी सूचना केल्या
चेअरमन श्री सत्येन मुंदडा यांनी खातेदारांना चांगली सेवा देऊन बँकेचा नफा वाढविण्याचे आवाहन केले
या करार स्थापने साठी जिल्हा कर्मचारी युनियनचे कार्याध्यक्ष श्री धनंजय भंडारे, सचिव श्री एम यु कुलकर्णी , सहसचिव श्री प्रदीप नवले, बँकेचे जनरल मॅनेजर श्री एकबोटे साहेब , असिस्टंट जनरल मॅनेजर श्री छाजेड साहेब , सेवक संचालक श्री पैठणकर श्री पापडीवाल व संचालक डॉक्टर विजय कोठारी श्री रवींद्र ठोळे व सर्व संचालकांनी परिश्रम घेतले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत