बड्या नेत्यांची अतिक्रमण काढल्याने नेते आक्रमक - अँड.नितीन पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बड्या नेत्यांची अतिक्रमण काढल्याने नेते आक्रमक - अँड.नितीन पोळ

कोपरगाव/वेबटीम:- मागील दहा वर्षांपासून गोरगरीब विस्थापित टपरी धारक पुनर्वसन व्हावे म्हणून लढा देत असताना कोणताही नेता व नगर सेवक या विषयावर ...

कोपरगाव/वेबटीम:-

मागील दहा वर्षांपासून गोरगरीब विस्थापित टपरी धारक पुनर्वसन व्हावे म्हणून लढा देत असताना कोणताही नेता व नगर सेवक या विषयावर बोलत नव्हता मात्र बड्या नेत्यांची  अतिक्रमण काढल्याने व नगरपालिका निवडणूक जवळ आल्याने राजकीय नेत्यांना विस्थापित टपरी धारकांच्या प्रश्नांची आठवण आली का ? असा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडला आहे असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रजद्वारे उपस्थित केला आहे

आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की मागील अकरा वर्षांपूर्वी हजारो टपरी धारकांची अतिक्रमण काढण्यात आले या टपरी धारकांच्या शिष्टमंडळाने वेळोवेळी पुनर्वसन व्हावे अशी मागणी केली विस्थापित टपरी धारकांमधील २७ लोक मरण पावले अनेक लोक बेरोजगार झाले कधी काळी व्यावसायिक असलेले टपरी धारक मोलमजुरी करू लागले मात्र त्यांचे आसवं पुसायला कोणतेच नेते आले नाही अगर सत्ता असताना कोणी या टपरी धारकांची बाजू घेऊन पुनर्वसन करावे अशी मागणी केली नाही दि १० मार्च रोजी या टपरी धारकांच्या वतीने काळा दिवस पाळला त्या वेळी देखील कोणी नेते त्यांच्या कडे फिरकले नाही या उलट मागील वेळी अतिक्रमन काढलेल्या जागेवर अनेक नेत्यांनी पुन्हा अतिक्रमण करून स्वतः अथवा इतरा मार्फत आपले व्यवसाय सुरू ठेवले मात्र मागील आठवड्या पासून पुन्हा नगर पालिकेची अतिक्रमण काढण्याची दुसरी लाट आली त्यात अनेक उच्च भ्रू टपरी धारक विस्थापित झाले या अतिक्रमण मोहिमेचा फटका मोठ्या नेत्यांना बसला त्यामुळे प्रस्तापित नेत्यांना टपरी धारकांची आठवण झाली आता प्रस्तापित नेते टपरी धारकांच्या पुनर्वसन व्हावे म्हणून मागणी करत आहेत मात्र टपरी धारकावरील प्रेम बेगडी असून केवळ आणि केवळ जवळच्या लोकांची अतिक्रमण काढले व नगर पालिका निवडणूक जवळ म्हणून हे सुरू आहे असे एकंदरीत चित्र दिसून येत असून  नगर पालिकेने पुनर्वसन करायचे ठरवले तर आधी दहा वर्षांपूर्वी विस्थापित झालेल्या टपरी धारकांचे पुनर्वसन करावे असे या पत्रकात म्हटले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत