राहुरी : वेबटीम उंबरे सोसायटीसाठी अर्ज काढण्याची शेवटची 5 तारीख जशी जशी जवळ येईल, तसे गावचे राजकारण पुन्हा तापायला सुरुवात झाली आहे. ...
राहुरी : वेबटीम
उंबरे सोसायटीसाठी अर्ज काढण्याची शेवटची 5 तारीख जशी जशी जवळ येईल, तसे गावचे राजकारण पुन्हा तापायला सुरुवात झाली आहे. गावच्या बसस्टँडवर अनेक उमेदवार चर्चेत आहेत, हा फायनल होईल, तो फायनल होईल, याचीच चर्चा कानावर पडत आहे, त्यामुळे काही उमेदवार कागदावर चर्चेत असले तरी काहींनी उमेदवारी मिळावी, यासाठी छुपी जोरदार फिल्डिंग लावल्याचे चित्र आहे.उंबरे सोसायटीत तनपुरे कारखान्याचे चेअरमन नामदेव ढोकणे व माजी संचालक सुनील अडसुरे यांच्या विरोधात साहेबराव दुशिंग, नवनाथ ढोकणे, कारभारी ढोकणे, गंगाधर दादा ढोकणे, गोरक दुुशििंग, संतोष ढोकणे, नाना खंडू ढोकणे आदींनी कडवे आव्हान उभे केले आहे. 12 जागांसाठी 73 अर्ज आलेले आहेत. अर्ज माघारीची मुदत 5 एप्रिल असल्याने आता श्रेष्ठी उमेदवाऱ्या अंतिम करणार आहेत, त्यासाठी दोन्ही पार्ट्याकडून बैठकांना वेग आला आहे. जागा वाटप आणि उमेदवाऱ्या देताना गटतट विसरून जो विजयी होऊ शकतो, त्यालाच उमेदवारी द्यायची, असा दोन्ही पार्ट्यांमध्ये विचार झाला आहे. सध्या खालील उमेदवार चर्चेत असून, अंतिम उमेदवारी मात्र दोन्ही पार्टीचे श्रेेेष्ठठी ठरवनार असल्याने 5 तारखेनंतरच खरे चििित्र पुढे येणार आहे.
*जनरल : जनसेवा मंडळ* नानाभाऊ भानुदास ढोकणे, भाऊसाहेब नामदेव तांबे, भास्कर जगनाथ ढोकणे, शिवाजी जगनाथ अडसुरे, सोपान नाथा दुशिंग, संदीप केशव ढोकणे, दत्तात्रय राधकीसन ढोकणे, एकनाथ नारायण ढोकणे *जनरल गणराज मंडळ :* सुरेश किसन ढोकणे, विलास रघुनाथ ढोकणे, कारभारी पंढरीनाथ ढोकणे, मच्छिंद्र नारायण ढोकणे, कैलास पंढरीनाथ दुशिंग, दत्तात्रय निवृत्ती ढोकणे, दत्तात्रय एकनाथ ढोकणे, गीताराम दगडू ढोकणे( नामदेव भापकर) *महिला जनसेवा** कल्पना जालिंदर ढोकणे, गयाबाई भाऊसाहेब दुशिंग, *गणराज महिला* सुनीता परशराम ढोकणे, मीराबाई लक्ष्मण काळे *ओबीसी* जनसेवा : विष्णू रंगनाथ भापकर, गणराज : संदीप बाळासाहेब दुशिंग * *मागासवर्गीय* : गणराज : दीपक वसंत पंडित, जनसेवा अशोक नामदेव पंडित, भटक्या विमुक्त: *भाऊसाहेब बाचकर बिनविरोध जनसेवा**
कोणत्याही टिप्पण्या नाहीत