देवळाली प्रवरा(वेबटीम)'- देवळाली प्रवरा येथील प्रवीण बाळासाहेब चोळके व त्यांची पत्नी योगिता प्रवीण चोळके-टेमक यांना फार्मास्युटिकल रस...
देवळाली प्रवरा(वेबटीम)'-
देवळाली प्रवरा येथील प्रवीण बाळासाहेब चोळके व त्यांची पत्नी योगिता प्रवीण चोळके-टेमक यांना फार्मास्युटिकल रसायनशास्त्र विभागातील पीएचडी पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली आहे.
फार्मास्युटिकल शास्त्र विभागात राजस्थान राज्यातील अजमेर येथील भगवंत विद्यापीठाच्यावतीने प्रा.डॉ.नचिकेत शँकर दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.प्रवीण चोळके व त्यांच्या सौभाग्यवती प्रा.योगिता चोळके यांना फार्मास्युटिकल रसायनशास्त्र या विषयात विद्यावास्पती अर्थात पीएचडी पदवी बहाल करण्यात आली आहे.
प्रा.प्रवीण चोळके हे श्री.बाळासाहेब व सौ.पुष्पा चोळके यांचे सुपुत्र आहे. तर प्रा.योगिता चोळके या देवळाली प्रवरातील बापूसाहेब देवराम कडू यांच्या भाची तर बाळासाहेब चोळके यांच्या सून व प्रा.प्रवीण चोळके यांच्या धर्मपत्नी आहेत. चोळके दांपत्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत