निलेश लंके यांचा कार्यक्रम चुकवायचा नाही, हा आमचा निर्णय - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

निलेश लंके यांचा कार्यक्रम चुकवायचा नाही, हा आमचा निर्णय

  राहुरी/वेबटीम:- पारनेरचे आ. निलेश लंके यांचा वाढदिवस आज हंगा येथे पार पडला. या निमित्ताने सामाजिक बांधीलकी जोपासत ५१ जोडप्यांचा सामुदायिक ...

 राहुरी/वेबटीम:-


पारनेरचे आ. निलेश लंके यांचा वाढदिवस आज हंगा येथे पार पडला. या निमित्ताने सामाजिक बांधीलकी जोपासत ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. वाढदिवस तथा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यास माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांनी हजेरी लावली.पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये आ.लंके विषयी कौतुक केले आहे.

या फेसबुक पोस्ट मध्ये शरदचंद्रजी पवार यांनी म्हंटले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तसेच निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने हंगे येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास उपस्थित राहून वधु-वरांना शुभाशीर्वाद दिले. 


या विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचा निर्णय मी घेतला कारण निलेश लंकेंचा कार्यक्रम चुकवायचा नाही हा आमचा निर्णय झाला. विविध धर्मीयांचे विवाह आयोजित करून त्यांनी सर्वधर्म समभावाची इथे जपणूक केली, याचे समाधान वाटते.


दोन वर्षांपूर्वी कोरोनाचे संकट आले. लोकांमध्ये अस्वस्थता होती. लोकांची रोजी रोटी बुडाली. हजारो लोक मृत्यूमुखी पडले. अशा वेळी पारनेरचा आमदार घरी बसला नाही. रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था त्याने केली. स्वतःचा पगार त्यासाठी खर्च केला. लोकांनी दिलेल्या मदतीचेही योग्य नियोजन केले. कोरोनाच्या संकटात हा माणूस घरीही गेला नाही. मी राज्यात फिरतो त्यावेळी लोक मला सांगतात की आमदार लंंके यांना आमच्याकडे पाठवा. संकटकाळात लोकांच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा आमचा पारनेरचा सहकारी संपूर्ण राज्याला परिचित झाला आहे.


कोरोना काळात नागरिकांना मदतीचा हात देत कामाच्या माध्यमातून आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्याचे, जिल्ह्याचे तसेच महाराष्ट्राचे नाव देशात मोठे केले आहे. मी त्यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करतो. आणि हा समाजकार्याचा वसा त्यांनी असाच सदैव जपावा ही सदिच्छा व्यक्त करतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत