अहमदनगर(वेबटीम):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने गोरगरीब जनतेसाठी केलेल्या कामावर विश्वास ठेवून देशातील पा...
अहमदनगर(वेबटीम):-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने गोरगरीब जनतेसाठी केलेल्या कामावर विश्वास ठेवून देशातील पाचपैकी चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत दिले असून आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या विरोधकांना जनतेनेच मतदानाच्या माध्यमातून उत्तरे दिली असल्याची प्रतिक्रिया खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश, गोवा,मनिपुर, उत्तराखंड या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमत मिळाले. भाजप च्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला, त्यावेळी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी पक्षाच्या विजयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील सात वर्षात सामान्य माणसासाठी सुरू केलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली.त्यामुळेच विकासाच्या प्रक्रियेला मतदारांनी पाठबळ दिले असल्याचे डाॅ विखे म्हणाले.
डॉ. विखे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सारख्या देशद्रोही मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारला जनता आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उत्तर देईल. काही लोक प्रसार माध्यमात येतात ते आता फक्त जनतेचे मनोरंजनाचे साधन झाले असल्याचा टोला लगावतानच शिवसेना व राष्ट्रवादी सारख्या पक्षांना नोटाही पेक्षा कमी मते मिळाली, मंत्र्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेवर आरोप करीत राहणाऱ्या आघाडी सरकारला जनताच उत्तर देईल असेही विखे म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत