राहुरी/वेबटीम:- डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सेवाभावी संस्थेकडून बारागांव नांदूर येथील भाऊसाहेब यादव माने या दिव्यांग व्यक्तीस माजी नगराध्यक्ष...
राहुरी/वेबटीम:-

डॉ.बाबुराव बापुजी तनपुरे सेवाभावी संस्थेकडून बारागांव नांदूर येथील भाऊसाहेब यादव माने या दिव्यांग व्यक्तीस माजी नगराध्यक्ष डॉ. सौ उषाताई तनपुरे यांच्या हस्ते तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रभाकर रेवन्नाथ गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष आघाव ,महेश माने, संदीप आढाव ,बापूसाहेब दुशिंग, राम तोडमल ,प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष मधुकर घाडगे, छगन दुशिंग ,मच्छिंद्र ढोकणे, स्विय सहाय्यक रवींद्र मांडे आदी मान्यवर उपस्थित होते. बारागाव नांदूर येथील दौऱ्याचे दरम्यान राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाऊसाहेब माने या व्यक्तीची भेट घेऊन चौकशी केली होती ही व्यक्ती दिव्यांग असल्याने या व्यक्तीला प्रवास करण्याकरता साधनाची आवश्यकता होती ती मंत्री तनपुरे यांनी मागणी तात्काळ मान्य करून डॉ तनपुरे सेवाभावी संस्थेमार्फत त्यांना तीन चाकी नवीन सायकल देण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार आज तीनचाकी सायकलचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भाऊसाहेब माने यांनी मंत्री तनपुरे व त्यांच्या परिवाराचे आभार मानत आनंद व्यक्त केला. दिव्यांग्यांची अडचण समजावून घेत आधार दिला असल्याचे भाऊसाहेब यादव माने यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत