कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव विधानसभा मतदार संघातून जात असलेल्या झगडे फाटा-तळेगाव-वडगाव पान (राज्य मार्ग ६५) व सावळीविहीर-चास -भरवस-लासलगाव ...
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव विधानसभा मतदार संघातून जात असलेल्या झगडे फाटा-तळेगाव-वडगाव पान (राज्य मार्ग ६५) व सावळीविहीर-चास -भरवस-लासलगाव (राज्य मार्ग ७) या रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे या रस्त्यांना निधी मिळावा यासाठी २०२० पासून पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख तालुका हद्द व राज्यमार्ग ७ वरील शहाजापूर ते सात मोऱ्या तालुका हद्द या रस्त्यासाठी २० कोटीची २०२२-२३ च्या अर्थ संकल्पात तरतूद करण्यात आली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील रस्त्यांची मागील पाच वर्षात दयनीय अवस्था झालेली होती. त्यामुळे रस्ते विकासाचा मोठा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ना. आशुतोष काळे रस्त्यांना निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करीत होते. यामध्ये झगडे फाटा-तळेगाव-वडगाव पान (राज्य मार्ग ६५) व सावळीविहीर-चास-भरवस-लासलगाव (राज्य मार्ग ७) या रस्त्यांचा देखील समवेश होता. या रस्त्यांवर अनेक ठिकाणी लहान मोठ्या खड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे नागरिकांना व वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. हे प्रमुख राज्यमार्ग खराब झाल्यामुळे या मार्गाने येणाऱ्या वाहनांनी आपला मार्ग बदलून घेतला होता. त्यामुळे वाहनांची वर्दळ कमी होवून त्याचा परिणाम राज्यमार्गालगत व्यवसाय करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर होवून त्यांचे व्यवसाय थंडावले होते. तसेच शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांना देखील त्याचा मोठा त्रास होत होता.
याची ना. आशुतोष काळे यांनी दखल घेवून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोकराव चव्हाण, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्याकडे या राज्यमार्गांचे नूतनीकरण करण्यासाठी निधी मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून महाविकास आघाडी सरकारने झगडे फाटा ते रांजणगाव देशमुख तालुका हद्द व राज्यमार्ग ७ वरील शहाजापूर ते सात मोऱ्या तालुका हद्द या रस्त्यासाठी प्रत्येकी १० कोटी अशी एकूण २० कोटीची २०२२-२३ च्या अर्थ संकल्पात तरतूद केली आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासूनचा या रस्त्याच्या नूतनीकरणाचा प्रश्न ना. आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नातून मार्गी लागला आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यमार्गालगत असणाऱ्या गावातील नागरिक, साई भक्त व या मार्गाने नियमितपणे येणाऱ्या वाहन चालक तसेच रस्त्याच्या दुतर्फा व्यवसाय करणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यवसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. या रस्त्यांसाठी २० कोटीची २०२२-२३ च्या अर्थ संकल्पात तरतूद केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री ना. अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोकराव चव्हाण, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांचे मतदार संघातील जनतेच्या वतीने आभार मानले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत