कणगरचे सरपंच सर्जराव घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कणगरचे सरपंच सर्जराव घाडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

राहुरी/वेबटीम:- कणगर गावचे कर्तव्यदक्ष  सरपंच सर्जेराव गोरक्षनाथ घाडगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसा निमित्त ग्...

राहुरी/वेबटीम:-




कणगर गावचे कर्तव्यदक्ष  सरपंच सर्जेराव गोरक्षनाथ घाडगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

वाढदिवसा निमित्त ग्रामपंचायत कार्यालय परिसरात  श्री. भाऊसाहेब दिवे , श्री राजेन्द्र दिवे,श्री संजय पावसे, सौ. छायाताई दुशिंग, श्री पोपटराव नालकर, श्री केशवराव गोरे, श्री. महमद भाई इनामदार, श्री. संदीप घाडगे, श्री. बाळासाहेब गाढे, श्री. सुदर्शन दिवे, श्री श्रीराम घाडगे,गोरक्षनाथ नालकर, श्री. अजिजभाई शेख, श्री. रामदास दिवे,आदि नागरिकांनी नारळाची झाडे,  देणगी स्वरूपात देऊन सरपंच यांचे हस्ते ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर तरुण उद्योजक श्री रवि वरघुडे यांनी वडाची झाडं देऊन त्याची सरपंच व ग्रामस्थ यांच्या हस्ते गाव तळ्याच्या भरावला लागवड करण्यात आली.व वरघुडे वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी कामगार तलाठी श्री अंकूश सोनार, ग्रामविकास अधिकारी श्री. एन एम पवार, उपसरपंच श्री. बाबा गाढे, श्री भगवान गाडगे, श्री. आण्णासाहेब गाढे, श्री दिपक घाडगे,श्री. मच्छिंद्र वरघुडे , यशवंतराव जाधव, धोंडीराम जाधव, भारत खाटेकर, बाळासाहेब शिंगाडे, दिपक गाढे व ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत