कोपरगाव / प्रतिनिधी:- गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि बहुचर्चीत कोपरगाव शहराच्या पाणी योजनेचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. त्या...
कोपरगाव / प्रतिनिधी:-
कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नाला सर्वसामान्य नागरिकांच्या प्रयत्नांमुळे व जनआंदोलनामुळे अधिक बळ मिळाले. तसेच केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आणि नगर विकास मंत्रालयाच्या पडताळणी समितीने 123 कोटींच्या पाणी योजनेस 3 जानेवारी, 2022 मंजुरी दिली आहे. त्यावेळेस स्वतः आमदार व शहराच्या सर्वसामान्य नागरिकांच्यावतीने स्वतः राजेश मंटाला हजर होते. त्यानंतर ही फाईल नगर विकास मंत्रालयाने अंतिम प्रशासकीय मंजुरीसाठी पुढे पाठवली आहे. परंतु, दोन महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप प्रशासकीय मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे या योजनेला प्रशासकीय मंजुरी कधी मिळणार आणि प्रत्यक्ष काम कधी सुरु होणार याबाबत नागरिकांकडून विचारणा होत आहे. म्हणून आमदार आणि संबंधित जबाबदार अधिकार्यांनी लवकरात लवकर स्पष्टीकरण देऊन नागरिकांना माहिती द्यावी, असे आवाहन राजेश मंटाला यांसह सहकार्यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत