शेवगाव/वेबटीम:- कृषी निविष्ठा विक्रेत्यांकरीता राष्ट्रीय कृषि विस्तार प्रबंध संस्था (मॅनेज) हैदराबाद भारत सरकार मान्यताप्राप्त १ वर्षाचा कृष...
शेवगाव/वेबटीम:-
कृषी निविष्ठा विक्रेत्यांकरीता राष्ट्रीय कृषि विस्तार प्रबंध संस्था (मॅनेज) हैदराबाद भारत सरकार मान्यताप्राप्त १ वर्षाचा कृषि पदविका अभ्यासक्रम (डेसी) आत्मा, कृषि विभाग अहमदनगर सोबत नोडल प्रशिक्षण संस्था केव्हीके दहिगावने मार्फत चालविण्यात येत आहे. कृषी क्षेत्रात होणारे बदल अद्ययावत तंत्रज्ञान, बदलती पीक पद्धती, कृषी यांत्रिकीकरण, हवामान बदल, सौर शेती, जमीन वापराचे नियोजन व स्थान विशिष्ट तंत्रज्ञान इत्यादी विषयी सखोल ज्ञान कृषी सेवा केंद्र चालकाला आवश्यक आहे. यासाठी मॅनेज हैदराबाद यांच्या वतीने डेसी या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषी विज्ञान केंद्र दहिगावने मार्फत गेल्या ३ वर्षापासून हा पदविका अभ्यासक्रम घेतला जात आहे. या अभ्यासक्रमांतर्गत ४० प्रशिक्षणार्थी प्रवेश घेवू शकतात त्याकरिता कृषी सेवा केंद्र चालक व जे होतकरू तरुण-तरुणींना कृषी सेवा केंद्र चालू करायचे आहे असे युवक-युवती या अभ्यासक्रमासाठी नोंदणी करू शकतात.
केव्हिके दहिगावने मार्फत या प्रशिक्षणार्थीना कृषी व कृषी संलग्न विषयावरती शास्त्रज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाते. तसेच प्रक्षेत्र भेटी, अभ्यासदौरे, प्रात्यक्षिके या प्रकारचे उपक्रम राबविले जातात. याच अनुषंगाने कमी पाण्यात येणा-या ड्रॅगन फ्रुट या फळझाडाची लागवड ते उत्पादन या विषयीची माहिती व रोपांचे वाटप केव्हीके ने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात या प्रशिक्षणार्थीना करण्यात आले.
कृषी निविष्टा विक्रेते हे गाव पातळीपर्यंत कृषी विस्ताराचे काम करणारे महत्वाचे घटक आहे. याकरीता कृषी विषयाचे योग्य ज्ञान त्यांना अवगत असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन डॉ. एस.एस.कौशिक यांनी या आयोजीत कार्यक्रमात केले. तसेच श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ. नरेंद्रजी घुले पाटील व मा.आ. चंद्रशेखर घुले पाटील यांचे देखील मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी डेसी कार्यक्रमाचे समन्वयक सुभाष कोरडे, केव्हीके चे सर्व शास्त्रज्ञ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत