राहुरी फॅक्टरी (वार्ताहर):- तुम्ही किती काम करतात? तुम्ही कसे काम करतात? या गोष्टीला फारसे महत्त्व नाही,मात्र हाती घेतलेल्या कामाचे तुम्ही क...
राहुरी फॅक्टरी (वार्ताहर):-
तुम्ही किती काम करतात? तुम्ही कसे काम करतात? या गोष्टीला फारसे महत्त्व नाही,मात्र हाती घेतलेल्या कामाचे तुम्ही कसे नियोजन करतात यावरच हाती घेतलेल्या कामाचे यश अवलंबून असते.
साई आदर्श चे संस्थापक शिवाजीराव कपाळे यांनी ध्येय निश्चित करून वेड लागल्या प्रमाणे नियोजन बद्ध काम केल्यानेच साई आदर्शाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असल्याचे प्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे यांनी म्हटले आहे.
साई आदर्श मल्टीस्टेट च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 'ध्येय वेडे इतिहास घडवतात' या व्याख्यान कार्यक्रमात बानगुडे पाटील बोलत होते. साई आदर्श मल्टीस्टेट च्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी दहा वाजता पुणे येथील बुधरानी हॉस्पिटल च्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र शिबीर आयोजित करण्यात आले होते, या शिबिराचे उद्घाटन राहुरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे व देवळाली प्रवरा नगरपालिका मुख्य अधिकारी अजित निकत यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबिरात सुमारे पाचशेहून अधिक गरजूंनी लाभ घेतला. संस्थेच्या वतीने मोफत चष्मे तसेच ऑपरेशन साठी पुण्याला जाण्या-येण्याचा खर्च करण्यात आला.
सायंकाळी सत्रात वर्धापन दिनाच्या प्रमुख सोहळ्यात भव्य कार्यक्रमात सौ संगीता कपाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर प्रास्ताविकामध्ये संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव काळे यांनी साई आदर्शचा ९ वर्षाचा इतिहास व प्रगतीचा आलेख उपस्थितांसमोर मांडला.
याप्रसंगी संस्थेच्या वतीने पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, तहसीलदार फसीओद्दीन शेख, ऍड महेश बडाख, डॉ.आप्पासाहेब चव्हाण, डॉ .अनंत शेकोकर कुमारी तनिष्का तागड या मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रा.नितीन बानगुडे यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. साई आदर्शच्या उत्कृष्ट शाखा व चार वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचारी बांधवांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विविध संस्था संघटना व व्यक्तींनी चेअरमन शिवाजीराव कपाळे यांचा सन्मान केला व त्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर सुमारे दोन तास प्रा. बानगुडे यांनी आपल्या ओजस्वी वाणीतून 'ध्येयवेडे इतिहास घडवतात' या विषयावर व्याख्यान देऊन उपस्थित जनसमुदायाला मंत्रमुग्ध केले, याप्रसंगी प्रेरणा मल्टीस्टेट चे चेअरमन सुरेश शेठ वाबळे ,वसंत लोढा, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, आदर्श पतसंस्थेचे चेअरमन अण्णासाहेब थे, शिवसेना नेते अशोक थोरे,आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,ललित चोरडिया,करण नवले,सौ संगीता कपाळे, सौ.प्रीती कदम,सौ .ज्योती त्रिभुवन,वेदांत कपाळे, धीरज कपाळे विष्णुपंत गीते, किशोर थोरात,अविनाश साबरे,चंद्रकांत कपाळे, सचिव सचिन खडके, सर्व संचालक, ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक, अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजेश मंचरे यांनी सूत्रसंचालन केले तर धीरज कपाळे यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत