राहुरी/वेबटीम:- भाजपचे राहुरी तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आता अध्यक्ष पदासाठी इच्छुकांची भाऊगर...
राहुरी/वेबटीम:-
भाजपचे राहुरी तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आता अध्यक्ष पदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून इच्छुकांनीं विखे- कर्डीलेंकडे सेटिंग लावली आहे.
माजी आ.शिवाजी कर्डीले यांचे खास समजले जाणारे भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वाना धक्का देऊन मुंबईत ना.जयंत पाटील, ना.जितेंद्र आव्हाड, ना.प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
येत्या काही दिवसांवर नगरपालिका, पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका होणार असून भाजप तालुकाध्यक्ष पदाची रिक्त जागा भरण्याची गरज ओळखून भाजपच्या गोटातून हालचाली सुरू झाल्या आहेत. अमोल भनगडे हे कर्डीले यांचे खास समजले जायचे आणि तेच राष्ट्रवादीत दाखल झाले. मध्यंतरी माजी.आ. कर्डीले सुद्धा राष्ट्रवादीत जाणार असल्याचे वृत्त मीडियात झळकत होते. दस्तरखुद्द कर्डीले यांनी मी कोठेही जाणार नसून भाजपमध्येच राहणार असल्याचे सांगितले. मात्र हे होत असताना भाजपच्या वरिष्ठांनी सावध भूमिका घेऊन तालुकाध्यक्षपदासाठी एकनिष्ठ व्यक्ती निवड करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
दुसरीकडे माजीमंत्री राधाकृष्ण विखे व खा.डॉ.सुजय विखे यांनी आपल्याला मानणारा व्यक्ती तालुकाध्यक्ष बसावी यासाठी फ़िल्डींग लावली आहे. विखे गटाकडून विश्वास कडू यांचे नाव पुढे आले आहे. यासाठी सोनगाव व सात्रळ परिसरातील भाजप कार्यकर्त्यांनी गेल्या आठवड्यात कडू यांची तालुकाध्यक्षपदी वर्णी लागावी यासाठी विखे पिता-पुत्रांककडे साकडे घातले असल्याचे समजते. तर डॉ.तनपुरे साखर कारखान्याचे विद्यमान संचालक व भाजप युवमोर्चा तालुकाध्यक्ष रवींद्र म्हसे यांचे नाव तालुकाध्यक्ष पदासाठी आघाडीवर असून त्यांनी तालुकाध्यक्ष पदाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे.याशिवाय कणगरचे सरपंच सर्जेराव घाडगे यांचेही नाव आघाडीवर आहे. याशिवाय मच्छीन्द्र गावडे, सुकुमार पवार,राजू गोपाळे,संदिप गिते,राजेश उपाध्येय यांची नावे तालुकाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत