नगर ः वेबटीम पंजाब येथे नुकत्याच झालेल्या कुस्ती प्रशिक्षणात सर्वात मोठी समजली जाणारी ‘एनआयएस’ या पदवी परीक्षेत प्रा. गणेश अशोक शेजूळ यां...
नगर ः वेबटीम
पंजाब येथे नुकत्याच झालेल्या कुस्ती प्रशिक्षणात सर्वात मोठी समजली जाणारी ‘एनआयएस’ या पदवी परीक्षेत प्रा. गणेश अशोक शेजूळ यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे. शेजूळ हे राहुरी तालुक्यातील उंबरे येथील असून, ते वस्तात स्व. गंगामामा शेजूळ यांचे नातू आहेत.
प्रा. गणेश शेजूळ यांनी क्रीडा क्षेत्रातील शासनाच्या अधिन असलेले स्पोर्ट अर्थोरटी ऑफ इंडिया, प्रशिक्षण केंद्र पंजाब येथे कुस्ती प्रशिक्षण गुणवत्ता परीक्षा दिली. त्यात त्यांनी नेत्रदीपक यश मिळवले. त्यामुळे नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ स्पोर्टसची ‘एनआयएस’ ही मानाची समजल जाणारी कुस्ती प्रशिक्षक पदवी त्यांनी प्राप्त केली आहे.
शेजूळ यांनी एमए व नंतर एमपीएड ही शारीरक शिक्षणातील पदवी मिळवली. त्याचबरोबर नाशिक येथील विविध संस्थांमध्ये कार्यरत असताना त्यांनी स्टेट चॅम्पियन व नॅशनल चॅम्पियन खेळाडू घडविले आहेत. परंत्तु आता एनआयएस पदवी मिळवून त्यांनी अजून एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात रोवला आहे.
प्रा. शेजूळ यांचे मूळ गाव हे उंबरे आहे. उंबरे गावाला कुस्तीची मोठी परंपरा आहे. त्यांचे आजोबा स्व. गंगामामा शेजूळ हे ‘वस्ताद’ म्हणून ओळखले जात होते. त्याचबरोबरच स्व. भानाभाऊ आडसुरे, स्व. पांडुभाऊ ढोकणे, स्व. गणुभाऊ ढोकणे, स्व. गंगाधर साबळे, स्व. गंगामामा पटारे आदी मल्लांनी कुस्तीला सुवर्ण इतिहास दिला आहे. मात्र, कालांतराने कुस्ती लोप पावत असताना प्रा. शेजूळ यांनी कुस्ती क्षेत्रात मिळवलेले यश हे निश्चितच गावच्या लालमातीला पुन्हा चांगले दिवस दाखवणारे आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपली ही पदवी गावात मल्ल घडविण्यासाठी करणार असल्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यांचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, कारखान्याचे माजी संचालक सुनील आडसुरे, साहेबराव दुशिंग, नवनाथ ढोकणे, कारभारी ढोकणे, प्रा. रामकृष्ण ढोकणे, सरपंच सुरेश साबळे, उपसरपंच बापूसाहेब दुशिंग, कैलास आडसुरे, बाबासाहेब ढोकणे, दीपक पंडीत, लक्ष्मण पटारे, सुभाष साबळे, भारत कल्हापुरे आदींनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत