लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण लवकरात लवकर करावे - रवींद्र साबळे ‌ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण लवकरात लवकर करावे - रवींद्र साबळे ‌

कोपरगाव/वेबटीम:-   कोपरगाव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आणण्यात आला असून तो कित्येक दिवसापासून झाकून ठेवलेला आहे पुतळ...

कोपरगाव/वेबटीम:-


 कोपरगाव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आणण्यात आला असून तो कित्येक दिवसापासून झाकून ठेवलेला आहे पुतळ्याचे अनावरण लवकरात लवकर करावे या आशयाचे निवेदन रवींद्र साबळे कोपरगाव काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष विभाग यांच्या अध्यक्षतेखाली महिला जिल्हाध्यक्षा सौ सविता विधाते यांच्या उपस्थितीत कोपरगाव नगरपालिका  मुख्याधिकारी यांना देण्यात आले   


पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा थोर समाजसेवकांची व त्यांच्या विचारांची अवहेलना होत आहे त्याचा लोकार्पण सोहळा अद्याप झालेला नाही अशा महापुरुषांचा झाकून ठेवणे हे कितपत योग्य आहे तरी माननीय प्रशासन यास कळविण्यात येते की अचारसहिता लागण्या अगोदर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे  अनावरण करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने अनावरण केले जाईल या  कामी कुठलाही कुठला आहे अनुचित प्रकार घडल्यास त्यास सर्वस्वी जबाबदारी नगरपालिका  प्रशासनाची राहील  यादव त्रिभुवन, विष्णु पाडेकर, युसुफभाई शेख, शबीर शेख, छोटूभाई पठाण , अबूबकर मणियार, राजेंद्र पोटे, बौद्धाचार्य नानासाहेब जगताप ,संजय आव्हाड, सौ मंगल आव्हाड, मयूर गोरे, युनूस शेख, अल्तमस शेख, सतीश साबळे , राजन त्रिभुवन, बाबुराव पवार, राजेंद्र घोडेराव ,राजेंद्र लोहकरे ,अजहरुद्दिन मणियार, किशोर शेलार आदी  कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत