कोपरगाव/वेबटीम:- छत्रपती शिवजी महाराज यांची तिथीप्रमाने जयंती २१ मार्च रोजी कोपरगांव शहर शिवसेनेच्या वतीने दर वर्षी प्रमाणे साजरा करण्यात ...
कोपरगाव/वेबटीम:-
छत्रपती शिवजी महाराज यांची तिथीप्रमाने जयंती २१ मार्च रोजी कोपरगांव शहर शिवसेनेच्या वतीने दर वर्षी प्रमाणे साजरा करण्यात येणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्रजी झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ४० वर्षापासून कोपरगावात प्रसिद्ध असलेली अतिशय शिस्तब्ध शिवजयंती साजरा करण्यात येते व दरवर्षी नव नवीन उपक्रम शिवजयंती निम्मित घेण्यात येता. नुकतीच कोपरगांव शहर शिवसेनेची शिवजन्मोत्सव समितीची नेमणुक करण्यासाठी बैठक पार पडली.
या वेळी शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल,शिवसेना नगरसेविका सपनाताई मोरे, अहमदनगर जिल्हा नियोजन समिती सदस्य विशाल झावरे यांनी सर्व शिवसैनिकांना व शिवभक्तांना शिवजयंती विषयी मार्गदर्शन केले व शिवजन्मोत्सव समिती २०२२ ची कार्यकारणी जाहीर केली. शिवजन्मोत्सव समिती २०२२ चे अध्यक्ष शेखर कोलते, उपाध्यक्ष दत्तू पगारे, सचिव योगेश उशीर, वैभव गिते, सुनील कुंढारे,खाजिनदार बाळासाहेब साळुंके,गौरव गुप्ता, सांस्कृतिक कार्यक्रमप्रमुख शिवसेना नगरसेविका सपनाताई मोरे, वर्षाताई शिंगाडे,राखी विसपुते, अश्विनी होणे, अक्षिता आमले,शितल चव्हाण, शिवज्योत प्रमुख शिव वाहतूक सेनेचे अविनाश धोक्रट, अविनाश वाघ, प्रवीण शेलार, शिवराज्याभिषेक प्रमुख दिलीप अरगडे, श्रीपाद भसाळे,निखिल मढवई,मिरवणूक प्रमुख किरण अडांगळे,अक्षय वाकचौर,सुनील राका, स्वागत टीम वसीम शेख, सतीश शिंगाणे,संजय बाविस्कर,विजय शिंदे, मंगेश देशमुख, कार्यवाहक संतोष भालेराव, अमजद शेख,दिपक बरदे,राकेश वाघ. या प्रमाणे शिवजन्मोत्सव समितीची कार्यकारणी जाहिर करण्यात आली. या वेळी जेष्ठ शिवसैनिक संजय उदावंत, शिववाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख इरफान शेख, युवानेते विक्रांत झावरे,उपशहरप्रमुख प्रफुल्ल शिंगाड़े, विकास शर्मा,प्रसिद्धि प्रमुख अशोक पवार,विभागप्रमुख विजय शिंदे, राहुल हस्वाल, सतीश खर्डे,श्रीपाद भसाळे,जाफर पठाण,अक्षय नन्नावरे,रवींद्र पवार,भूषण वडांगळे,सुमित बोर्डे आदी शिवसैनिक व शिवभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना प्रवक्ते राहुल देशपांडे यांनी केले तर आभार शिवसेना सचिव बाळासाहेब साळुंके यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत