कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यात जेऊर कुंभारी येथील भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष सुधाकर वक्ते यांनी सांगितले की आता दि.४ मार्चपासुन बार...
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यात जेऊर कुंभारी येथील भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष सुधाकर वक्ते यांनी सांगितले की आता
दि.४ मार्चपासुन बारावीचे ऑफलाईन पेपर सुरु झाले असुन तसेच १६ मार्च पासुन दहावीचे पेपर सुरू होत आहे
विद्यार्थींसाठी हे दोन्ही वर्ष अतिशय महत्त्वाचे आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी शक्यतो रात्रीच्या शांत वातावरणात अभ्यासाकरणे पसंत करतात तरी महावितरण कंपनीने परीक्षा काळात वीज पुरवठा खंडीत करू नये असे अशी मागणी भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष सुधाकर वक्ते यांनी केली आहे. कोरोनाचा तिन वर्षाच्या खडतर कालखंडानंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात ऑफलाईन परीक्षा घेतल्या जात असुन विद्यार्थीचे भविष्य या परीक्षेवर अवलंबून आहे प्रत्येक पालकाची आपल्या मुलांना चांगले मार्क मिळाले पाहिजे अशी इच्छा असते त्यानुसार विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करत असतात परंतु रात्रीचा वेळी वारंवार वीजपुरवठा खंडीत झाल्यास अभ्यासात खंड पडत एकाग्रता भंग होते तरी या सर्व बाबींचा विचार करून महावितरण कंपनीने परिक्षा कालावधीत वीजपुरवठा खंडित करू नये तसेच ग्रामीण भागात वीजबील वसुलीसाठी रोहीतंत्रे बंद करण्याचा जो सपाटा लावला आहे,त्या संदर्भात कंपनीला वेळोवेळी निवेदन दिले.माजी आमदार स्नेहलता कोल्हे, औद्योगीक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी ही शेतकऱ्यांचा विजपुरवठा खंडीत करू नये यासाठी सतत पाठपुरावा केला आहे.तरी
परीक्षांच्या काळा विज पुरवठा खंडीतकरू नये अशी विनंती सुधाकर यांनी वक्ते कोपरगाव महावितरण अधिकारी शेलार साहेब, असिस्टंट इंजिनिअर खंदारे साहेब
केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत