रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक महिला दिना निमित्त - स्त्री शक्तीचा जागर - - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये जागतिक महिला दिना निमित्त - स्त्री शक्तीचा जागर -

कोपरगाव/वेबटीम:-  शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे स्थापित रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये दि . ८ मार्च२०२२ रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला ....

कोपरगाव/वेबटीम:- 



शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे स्थापित रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये दि . ८ मार्च२०२२ रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला . या विशेष दिनासाठी वाय . श्रीलक्ष्मी , एस. नागालक्ष्मी या ज्येष्ठ समाजसेविका यांसह संस्थेचे सचिव मा. श्री . संजयजी नागरे सर यांची प्रमुख उपस्थिती होती . मोनाली सुराळे मॅडम यांनी कार्यक्रमाचे  प्रास्ताविक मांडले .कु . समिना शेख , कु .दिक्षा गंगवाल या विद्यार्थीनींसह नंदिनी वक्ते मॅडम यांनी महिला दिना निमित्त भाषणे सादर केली . रियांशी वाळूंज, ईश्वरी ढमाले , हर्षदा शिंदे , आर्यश्री पंडोरे ,आदीती गुरसळ, रिद्धीमा चौधरी या 

विद्यार्थीनींनी अनुक्रमे झाशीची राणी, इंदिराजी गांधी , सिंधुताई सपकाळ, लता मंगेशकर यांच्या भूमिका वठवत त्यांच्या उत्तुंग कार्याची आठवण करून दिली. 

' मेरिष्का सबलोक' या विद्यार्थीनीने  बहारदार नृत्याविष्कार सादर केला . तसेच गुलाबपुष्प देऊन शिक्षक व शिक्षकेत्तर महिला कर्मचाऱ्यांचा गौरवही या वेळी करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता पाटील मॅडमसह कु .इनया पठान या  विद्यार्थीनीने केले तर संस्थेचे सचिव मा.श्री. संजयजी नागरे सर व प्रशासक सुरेशजी शिंदे सर यांनी उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या .संस्थेचे अध्यक्ष श्री. कांतीलालजी अग्रवाल सर, विश्वस्त श्री. मनोजशेठ अग्रवाल, विश्वस्त श्री. आनंदजी दगडे , कार्यकारी संचालक आकाशजी नागरे सर, 

उप-प्राचार्य सोमनाथ सोनवणे, प्रविण कदम, प्रशांत भास्कर आदींनी  महिला दिनाच्या शुभेच्छा देत या छोटेखानी परंतू माहितीपूर्ण  कार्यक्रमाचे कौतुक केले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत