कोपरगाव प्रतिनिधी- गोदामाई प्रतिष्ठानच्या वतीने शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदीमध्ये रक्षा विसर्जित केल्यानंतर त्यात असलेले एक दोन ...
कोपरगाव प्रतिनिधी-
गोदामाई प्रतिष्ठानच्या वतीने शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदीमध्ये रक्षा विसर्जित केल्यानंतर त्यात असलेले एक दोन रुपये गोळा करून आपल्या संसाराचा गाडा चालवणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिनी सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, प्रज्वल ढाकणे व वैष्णवी ढाकणे आदी सह सदस्य उपस्थित होते.
यावेळी गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी सांगितले की दि ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो पण कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदामाई पात्रात मौंनगिरी सेतू जवळ शहरातील गरीब कुटूंबातील वयस्कर महिला कमरा इतक्या पाण्यात उतरून आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कुटूंबाच्या घर खर्चासाठी छोटासा हातभार लागावा या उद्देशाने गोदा पात्रात रक्षा विसर्जनात टाकलेले एक दोन रुपये सापडण्यासाठी दिवसभर उन्हा- तान्हात उभ्या असतात अशा उपेक्षित महिलांचा महिलादिनी सन्मान करणे एक गोदावरी प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष म्हणून मी माझे आद्य कर्तव्य समजतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत