देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील महिला कामगारांना आज महिला दिनाच्या निमित्ताने शिवबा प्रतिष्ठान व न...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील महिला कामगारांना आज महिला दिनाच्या निमित्ताने शिवबा प्रतिष्ठान व नगरसेवक अदिनाथ कराळे यांच्यावतीने पैठणी साड्यांचे वाटप करण्यात आले.
३६५ दिवस देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या माध्यमातून देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात सफाई काम करणाऱ्या २५ महिलांचा पैठणी साड्या देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना महिला सफाई कामगार म्हणाल्या की, आम्ही नगरपालिकेमार्फत स्वच्छतेचे काम करत असताना आज आमचा नगरसेवक कराळे यांनी महिला दिनाच्या निमित्ताने आदिनाथ कराळे यांनी महिला दिनी पैठणी साड्या देऊन गौरव केला हा क्षण कधीही विसरू शकत नाही.
यावेळी देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत,कार्यालयीन अधीक्षक बन्सी वाळके, शिवबाप्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक आदिनाथ कराळे,सिद्धार्थ कड, अमोल कुऱ्हाडे, कृष्णा महांकाळ, विवेक विश्वासराव, अमल वाळके, बंटी शिंदे, शुभम वास्कर, नागेश शेकडे, कृष्णा डोंगरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत