कोपरगाव/वेबटीम:- गेल्या ११ वर्षांत विस्तापितांच्या प्रश्नावर प्रामाणिक प्रयत्न झाले असते तर कोणीच विस्थापित राहिले नसते अशी खंत लोक स्वराज्य...
कोपरगाव/वेबटीम:-
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की
गेल्या ११ वर्षांपूर्वी कोपरगाव शहराच्या मुख्य रस्त्यावरचे अतिक्रमण काढले गेले त्यात सुमारे १३०० गोर गरीब नागरिकांची छोटी मोठी दुकाने काढली गेली शहराचा गुदमरलेला स्वास मोकळा करण्यासाठी लाखो रुपये खर्च करून ही अतिक्रमणे काढली गेली असली त्यात अनेक गोरगरीब विस्थापित झाले ज्यांच्या कडे पैसे होते त्यांनी नवीन जागा घेऊन आपले व्यवसाय सुरू केले मात्र गोरगरीब जनतेला या अतिक्रमण मोहिमेची झळ सोसावी लागली अनेकांनी आपले व्यवसाय सोडून दुसरी कडे काम शोधले तर कित्येकजण व्यवसाया निमित्ताने गाव सोडून गेली मात्र तरी त्या नंतरच्या काळात सर्वच निवडणुकी आधी कोपरगाव शहरातील राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विस्थापित टपरी धारकांचे पुनर्वसन करू अशी आश्वासने दिली तर काही राजकीय नेत्यांनी निवडणूक आधी विस्थापित टपरी धारकांना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ असे सांगून सत्तेच्या खुर्च्या उबवल्या मात्र आज आकरा वर्षानंतर देखील हा प्रश्न तसाच प्रलंबित आहे
कोपरगाव शहरातील राज्य कर्त्याना टपरी धारकांची खरोखरच काळजी असती तर किमान रस्त्यात अडथळा होणार नाही अशा नगर पालिकेच्या जागेवर या विस्थापित टपरी धारकांना जागा उपलब्ध करून देता आली असती तसेच बस स्टॅण्ड वर गाळे बांधून काही प्रमाणात ही समस्या सोडवता आली असती
उद्या १० मार्च रोजी विस्थापित टपरी धारकांनी *काळा दिवस* पाळून आंदोलनाचा इशारा दिला मात्र या आंदोलनाकडे निवडणुकी आधीचे आंदोलन म्हणून चर्चा केली जात आहे मात्र एखादा प्रश्न सोडवताना सातत्याने अकरा वर्ष संघर्ष करावा लागत असेल तर ते निवडणुकी आधी भूलथापा देऊन जनतेची फसवणूक करणाऱ्या प्रस्तापित राजकीय नेत्यांचे देखील दुर्दैव आहे मात्र हा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले असते तर आज हे व्यावसायिकाना आंदोलन करण्याची वेळ आली नसती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत