कणगर(वेबटीम):- कणगर येथील गाढे वस्ती ( वडाचे लवण) जिल्हा परिषद शाळेत महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. राजमाता जिजाऊसाहे...
कणगर(वेबटीम):-
कणगर येथील गाढे वस्ती ( वडाचे लवण) जिल्हा परिषद शाळेत महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
राजमाता जिजाऊसाहेब, झाशीची राणी लक्ष्मीबाई,पहिल्या महिला शिक्षिका सावित्री बाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर रमाबाई आंबेडकर, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच श्री सर्जेराव घाडगे, उपसरपंच बाबा गाढे, उपस्थित होते. यावेळी महिलांच्या पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची ई स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेनंतर बक्षीस वितरण करण्यात आले.तसेच पोलिस शिपाई स्वाती सुरेश बर्डे यांच्या आई पुष्पाताई बर्डे, सैनिक गणेश बाळासाहेब साळवे यांच्या आई मुक्ताबाई साळवे खाजगी कंपनीत अधिकारी पदावर काम करणारे रावसाहेब जालिंदर गाढे यांच्या आई कमल बाई गाढे यांचा सन्मान केला.
यावेळी सौ. केशरबाई गाढे, श्रीमती शिलाताई गाढे, सौ.कमल ताई जाधव, श्रीमती विमलताई जाधव सौ अनिता सिनारे, सौ. जयश्री मुसमाडे, श्रीमती मीराबाई कवाने, सौ. संगीता गाढे, सौ. सुवर्णा गाढे, सौ. रंजना गाढे, सौ. सुशीला घोरपडे श्रीमती उज्ज्वला कोतकर, लक्ष्मी दुधाडे ,महमद भाई इनामदार, बाळासाहेब गाढे, पवन गाढे यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे परीक्षण व सूत्र संचालन आदर्श शिक्षक विठ्ल काकडे सर व रिना रायकर मॅडम यांनी केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत