सात्रळ/वेबटीम:- सात्रळ येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कारा साठी आलेल्या वृद्धांची अंत्यविधी होईपर्यंत बसण्याची मोठी गैरसोय होत असल्याच्या ...
सात्रळ/वेबटीम:-
सात्रळ येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कारा साठी आलेल्या वृद्धांची अंत्यविधी होईपर्यंत बसण्याची मोठी गैरसोय होत असल्याच्या जाणिवेतून ही अडचण सोडविण्याच्या दृष्टीने स्मशान भूमी मध्ये सात्रळ येथील रवींद्र संपतराव कडू यांनी त्यांचे वडील कै. ऍड. संपतराव बापूनाना कडू यांच्या स्मरणार्थ तीन सिमेंट बाकडे तसेच धोंडीराम कारभारी कडू यांनी त्यांच्या सुनबाई कै.सौ. नंदाताई संजय कडू यांच्या दशक्रिया विधी प्रसंगी त्यांच्या स्मरणार्थ दोन सिमेंट बाकडे अर्पण केले आहेत. सदर बकड्यांमुळे स्मशान भूमीत अंत्यविधी साठी येणाऱ्या वृद्धाची बसण्याची अडचण दूर झाल्यामुळे परिसरातील ग्रामस्थ दोन्ही कुटुंबियांना धन्यवाद देत आहेत. या प्रसंगी रवींद्र कडू, किरण कडू, संजय कडू, संभाजी कडू, संपत कडू, नंदूभाऊ कडू, रमेश पन्हाळे, सुभाष डुक्रे,राजेंद्र कडू, हर्षल कडू, कमलेश नलगे, प्रशांत कडू, संजय नागरे,गोरक्ष नालकर, भाऊसाहेब कडू तसेच कडू कुटुंबातील सदस्य उपस्तिथ होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत