कोपरगाव नगरपरिषद प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगाव नगरपरिषद प्रारूप प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

  कोपरगाव(प्रतिनिधी):-   नगरपालिका निवडणुका वेळेत होतील कि नाही यावर गेल्या दिड महिन्यांपासून सुरु असलेल्या चर्चेला अखेर पुर्णविराम मिळाला आ...

 कोपरगाव(प्रतिनिधी):-


 नगरपालिका निवडणुका वेळेत होतील कि नाही यावर गेल्या दिड महिन्यांपासून सुरु असलेल्या चर्चेला अखेर पुर्णविराम मिळाला आहे. कोपरगाव नगरपालिकेची प्रभाग रचना (Ward Structure) दि.१० मार्च,गुरुवार रोजी दुपारी जाहीर झाली असून, यंदा १५ प्रभाग राहणार आहेत.



सकाळपासूनच नगरपालिका कार्यालयांमध्ये इच्छुकांसह विद्यमान नगरसेवकांनी एकच गर्दी केली होती. यंदा कोपरगाव नगरपालिकेची १६ वी पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यादृष्टीने प्रारूप प्रभागरचनेची माहिती आज अहमदनगर जिल्हा अधिकारी भोसले यांनी प्रसार माध्यमांना दिली. यंदा एका प्रभागातून दोन सदस्य अर्थात दोन नगरसेवक निवडले जाणार आहेत. तसेच आजपासूनच हरकती व सूचना मागविल्या जाणार असून त्यानुसार एप्रिल महिन्यात महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होतील असा अंदाज वर्तविला जात आहे.


अहमदनगर जिल्ह्यातील चार नगरपंचायती व नऊ नगर पालिकांची मुदत संपत आली होती. त्यातील चार नगर पंचायतींची निवडणूक नुकतीच झाली. शिर्डी नगरपंचायतची नगरपरिषद झाली असल्याने त्यांची निवडणूक लवकरच होणार आहे. अशा स्थितीत आज राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे


*प्रभाग रचना कार्यक्रम कसा असेल*


2 मार्च पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य निवडणूक यांच्याकडे सादर करण्यात येईल. 7 मार्चपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला मान्यता मिळेल. 10 मार्चपर्यंत प्रारूप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे रहिवाश्यांच्या माहितीसाठी न हरकती तसेच सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्यात येईल. 10 ते 17 मार्च या कालावधीत हरकती मागविण्यात येतील. 22 मार्चला हरकतींवर सुनावणी होईल. 25 मार्चपर्यंत हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे अहवाल पाठविण्यात येईल. 1 एप्रिलपर्यंत अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देण्यात येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत