रयत शैक्षणिक संकुल सात्रळ येथील विद्यार्थ्यांचा एस.एस.सी परीक्षेसाठी शुभचिंतन समारंभ संपन्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

रयत शैक्षणिक संकुल सात्रळ येथील विद्यार्थ्यांचा एस.एस.सी परीक्षेसाठी शुभचिंतन समारंभ संपन्न

सात्रळ/वेबटीम:- रयत शिक्षण संस्थेचे, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय सात्रळ ता.राहुरी येथील इ.१० च्या विद्यार्थ्यांचा एस.एस.सी परीक्षेसाठ...

सात्रळ/वेबटीम:-



रयत शिक्षण संस्थेचे, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय सात्रळ ता.राहुरी येथील इ.१० च्या विद्यार्थ्यांचा एस.एस.सी परीक्षेसाठी शुभेच्छा व शुभचिंतन समारंभ नुकताच संपन्न झाला.

       याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे, संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील आणि थोर स्वातंत्र्य सेनानी कॉ.पी.बी कडू पाटील तथा आप्पांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक श्री. एस.जी.बिडगर यांनी केले.यानंतर कृष्णा गिरी,तुषार दिघे, जगदीश घोरपडे या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली.त्याचप्रमाणे विद्यालयाचे शिक्षक श्री.एस.एस.झावरे व सिराज मन्सुरी यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

          याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते,माजी रयतसेवक श्री.पोपटराव पवार यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत विद्यार्थ्यांना बोलके केले.व अभ्यासाविषयी नवनवीन क्लृप्त्या सांगितल्या आणि आपल्या जीवनातील आईचे महत्त्व विशद केले.

अशा व्यक्तींचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात घ्यावा.असे प्रतिपादन पवार यांनी केले.

      तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले विद्यालयाचे प्राचार्य अशोकराव वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना संघर्षातून जगायला शिका, कारण जीवनात येणाऱ्या अनेक आव्हानांचा सामना केल्या शिवाय यश मिळत नाही.असे विचार मांडले.

     हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इ.१० वी चे वर्गशिक्षक श्री.युनूस पठाण,श्री.भारत कोहकडे,श्री.संजय दिघे आदि सर्व सेवकांनी परिश्रम घेतले.

  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास गभाले यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्री.टी.एस.राशीनकर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत