युवकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी उदयन गडाखांचे कार्य लोकाभिमुख- नवगिरे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

युवकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी उदयन गडाखांचे कार्य लोकाभिमुख- नवगिरे

नेवासे (प्रतिनिधी)-:  तालुक्याबरोबरचं जिल्ह्यातील मोठा युवकांचा गोताळा,मित्र परिवार तसेच दांडगा जनसंपर्क असणारे त्यामधून युवकांचे प्रश्न सोड...

नेवासे (प्रतिनिधी)-: 



तालुक्याबरोबरचं जिल्ह्यातील मोठा युवकांचा गोताळा,मित्र परिवार तसेच दांडगा जनसंपर्क असणारे त्यामधून युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अविरतपणे काम करणारे मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष तथा युवा सेनेचे उदयन शंकरराव गडाख पाटील यांचे कार्य लोकाभिमुख असून भविष्यात त्यांचा हातून जनसामान्यांन साठी मोठं काम होणार असल्याचं महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे अहमदनगर जिल्हाप्रमुख बाळासाहेब नवगिरे हे उदयन गडाख यांच्या वाढदिवसानिमित्ताने पानेगांव ( ता. नेवासे) जिल्हापरिषद शाळा विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते

अध्यक्षस्थानी उपसरपंच रामराजे जंगले हे होते.

नवगिरे यांनी या वेळी म्हटले की, उदयन गडाख यांनी कोरोनाच्या काळात आपलंच कुटुंब प्रमाणे नियोजन करुन अनेकांना सहकार्य करुन युवकांन बरोबरच थोरांनी सुद्धा त्यांचे कौतुक करुन आताची तरुण पिढी कसा पद्धतीने काॅलेज मध्ये रमताना दिसते परंतु उदयन गडाख नेहमीच जनतेच्या समस्या बाबत माहिती घेवून सोडविण्यासाठी प्रयत्न करत असतात. सुख दुःखात जावून आधार देवून उदयन गडाख हे तालुक्यातील युवकांना आधारवड वाटतं आहे.   जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचा विचारानं तसेच महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख पाटील यांचा मार्गदर्शनाखाली उदयनदादांचे कार्य हेवा वाटतो असं काम सुरू असून तालुक्याबरोबरचं जिल्ह्याला उद्योनमुख युवकांचे नेतृत्व मिळाले असं नवगिरे यांनी म्हटले.

यावेळी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष किशोर जंगले, प्रगतीशील शेतकरी गणेशराव चिंधे, विशाल जंगले,गुलाबराव गायकवाड, लक्ष्मीकांत जंगले, शिक्षकवृंद पुरुषोत्तम आंधळे, विष्णू दहिफळे, मच्छिंद्र खेमनर, बाळासाहेब जावळे आदींसह विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते. 

सुत्रसंचालन- मच्छिंद्र खेमनर यांनी केले आभार, विष्णू दहिफळे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत