कोपरगाव/वेबटीम:- मार्च- कोपरगाव शहरातील विस्थापित टपरी धारकांचे अतिक्रमण दिनांक 3 -10 -2011 रोजी काढण्यात आले होते. आज 10- 3-2022 ला अकरा ...
कोपरगाव/वेबटीम:-
मार्च- कोपरगाव शहरातील विस्थापित टपरी धारकांचे अतिक्रमण दिनांक 3 -10 -2011 रोजी काढण्यात आले होते. आज 10- 3-2022 ला अकरा वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने सर्व
विस्थापितांनी काळा दिवस म्हणून पाळण्यात आला व त्या निमित्ताने नगरपालिकेवर मोर्चा नेऊन कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी गोसावी साहेब यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी कोपरगाव शहरातील विस्थापित टपरीधारकांवर अकरा वर्षांमध्ये झालेला अन्याय व कुटुंबात झालेली वाताहात तसेच अकरा वर्षांमध्ये 27 जनांनी जगाचा घेतला निरोप, मुलांचे राहिलेल्या अपूर्ण शिक्षण,तर काहींनी गाव सोडले. अशा विविध प्रकारच्या समस्या मुख्याधिकारी गोसावी साहेब यांच्याकडे कथित केल्या. विस्थापितांच्या समस्या मुख्याधिकारी साहेब ऐकत असताना त्यांनादेखील गहिवरून आले.
यावेळी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी गोसावी यांनी म्हटले की, आपण गेल्या अकरा वर्षापासून विविध संघटनेच्या माध्यमातून निवेदन देत आले आहात. परंतु आपला आत्तापर्यंत प्रश्न सुटलेला दिसत नाही. माझ्या परीने विस्थापित टपरी धारकांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल. अशीच परिस्थिती शिर्डी मध्ये झाली होती. त्या ठिकाणी मी दोनशे ते अडीचशे विस्थापितांना देखील न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला व तो पूर्णत्वास नेला. कोपरगाव मध्ये देखील विस्थापितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल अशी भावना व्यक्त केली. हे ऐकून विस्थापित देखील काही वेळ स्तब्ध झाले. व सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसू लागले.
यावेळी एडवोकेट नितीन पोळ. (लोकस्वराज्य आंदोलन चे प्रदेशाध्यक्ष), अजय विघे. (श्रमिकराज कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष), अकबरभाई शेख. (कोपरगाव व्यापारी समिती संस्थापक अध्यक्ष), निसरभाई शेख. (भूमिपुत्र फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष), शरद त्रिभुवन. (संस्थापक अध्यक्ष क्रांतिवीर लहुजी टायगर सेना), आयुब भाई शेख (मुस्लिम कमेटी तालुका अध्यक्ष) , शफिक भाई सय्यद (सामाजिक कार्यकर्ते) , अशोक पांडुरंग धुमाळ. (सामाजिक कार्यकर्ते) बाळासाहेब जाधव आदींनी आपले विचार तळमळीने मांडले.
यावेळी उमेशजी धुमाळ (सामाजिक कार्यकर्ते), सुखदेव जाधव . (अध्यक्ष अण्णाभाऊ साठे कृती समिती), सोमनाथ कारभारी आसणे (ज्येष्ठ कार्यकर्ते), संतोष कानडे.( सामाजिक कार्यकर्ते), राजाराम लोहकरे, संजयजी सोनवणे, राहुलजी पैलवान, संजय पोटे, सुरेश राधु त्रिभुवन, इस्माईल शेख, नितीन भुजबळ, मनियार नईम रशीद, सय्यद शफिक समा, अशोक नरोडे , विनायक वामन, दत्तात्रय दुशिंग, गोरख बोराडे, विकास बिडवे, शिवाजी जाधव, विनायक देवराम बिडवे, अशोक पठाडे, किरण संजय खैरे, बालाजी गोरडे, शेख आयुबभाई, राजेंद्र बागुल. (सामाजिक कार्यकर्ते) श्रीराम राजाराम अहिरे, आदींनी मोर्चा मध्ये सहभागी होऊन मुख्याधिकारी गोसावी यांना निवेदन देण्यात आली.
यावेळी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत