राहुरी(वेबटीम):- जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत राहुरी तालुक्यातील 12 गावातील योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती राज्यमंत्री...
राहुरी(वेबटीम):-
जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत राहुरी तालुक्यातील 12 गावातील योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली
या पाणीपुरवठा योजनांसाठी सुमारे 13 कोटी 96 लाख 25 हजार रुपये खर्च येणार आहे. यामध्ये राहुरी तालुक्यातील मांजरी 1 कोटी 21 लाख 62 हजार वडनेर 1 कोटी नऊ लाख 26 हजार बोधेगाव 51 लाख 84 हजार ब्राम्हणगाव भांड 90 लाख 51 हजार करजगाव 95 लाख 18 हजार , गंगापूर 74 लाख सहा हजार , मानोरी 1 कोटी 43 लाख 56 हजार , संक्रापूर एक कोटी 17 लाख पाच हजार पिंपरी वळण 1 कोटी 44 लाख 67 हजार आंबी 86 लाख 41 हजार तांभेरे एक कोटी 99 लाख तीन हजार तांदुळवाडी एक कोटी 63 लाख सहा हजार अशा एकूण 12 गावांसाठी अंतर्गत येणाऱ्या असणाऱ्या खर्चाला प्रशासकिय मान्यता मिळालेली आहे लवकरच जल जीवन मिशन कार्यक्रमाद्वारे घरोघरी शुद्ध पिण्याच्या पाणी पुरवठा होणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केले. मागिल काही दिवसापुर्वी तालुक्यातील 11 गावांसाठी 7 कोटी 82 लाख तसेच ब्राम्हणी व 7 गावाकरीता 53 कोटी 86 लाख रुपये मंजुरी झाले आहे. तसेच राहुरी विधानसभा मतदार संघात विविध विकास कामांची मालिका सुरूच ठेवलेली असून रस्ते ,वीज ,पाणी ,तलाव दुरुस्ती आदी कामांसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगत विज ,रस्त्याच्या व पिण्याच्या पाणी योजना कामांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले असल्याचे मंत्री तनपुरे यांनी नमूद केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत