राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव एकता समिती वांबोरी यांच्यावतीने ११ एप्रिल ते १...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव एकता समिती वांबोरी यांच्यावतीने ११ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
वांबोरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव एकता समितीच्या अध्यक्षपदी अतिश मकासरे तर उपाध्यक्ष आशितोष ससाणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त वृक्षारोपणा कार्यक्रम तर १२ एप्रिल रोजी डोंगरगण या गडावर गुरांसाठी चारा व पक्षांसाठी दाणे - पाणी उपक्रम, १३ एप्रिल रोजी आरोग्य श्रम कार्ड व विमा योजना कार्ड मोफत काढून दिले जाणार आहे..
१४ एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सकाळी ८ वाजता प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ११.३० ते १२.३० या वेळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते के एस बी पासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यत दुचाकी रॅली काढण्यात येणार आगे. सायंकाळी ठीक ५ ते ८ यावेळेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिरवणूक मिरवणुक काढण्यात येणार आहे.
दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे राष्ट्रीय दीपक निकाळजे यांचे खंदे समर्थक तथा राहुरी तालुकाध्यक्ष प्रदिप मकासरे यांना वांबोरी गावात समाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य समाज भूषण पुरस्काराने गौरविल्याबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत