कोपरगावमधील विस्थापितांच्या भावनांशी कुणीही खेळू नये :- वहाडणे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावमधील विस्थापितांच्या भावनांशी कुणीही खेळू नये :- वहाडणे

कोपरगाव / प्रतिनिधी:- गेल्या बारा वर्षांपूर्वी कोपरगाव शहरात विस्थापित झालेल्यांची झालेली फरफट लक्षात घेऊन कुणीही त्यांच्या भावनांशी खेळू नय...

कोपरगाव / प्रतिनिधी:-


गेल्या बारा वर्षांपूर्वी कोपरगाव शहरात विस्थापित झालेल्यांची झालेली फरफट लक्षात घेऊन कुणीही त्यांच्या भावनांशी खेळू नये, असे आवाहन माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विस्थापित झालेल्यांना न्याय मिळावा यासाठी मी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन नगररचना विभागाच्या अधिकार्‍यांना अनेकदा भेटलो, प्रस्ताव दिले. पण दुर्दैवाने आपण सूचविलेल्या जागांवर गाळे-खोका शॉप उभारायला परवानगी मिळाली नाही. विस्थापितांच्या प्रश्नांचे अनेकांनी राजकारण केले, निवडणुका लढविल्या. राज्यात सर्व पक्ष सत्तेवर येऊन गेले. पण तरी देखील हा प्रश्न सुटला नाही. ज्या जागांवरील अतिक्रमणे त्यावेळी हलविली त्या जागा मात्र काही टपरीमाफियांनी बळकावून भाड्याने दिल्या. त्या जागांवर व्यवसाय करणारे हातगाडीवाले-फेरीवाले-फळविक्रेते-अंडा भुर्जीवाले यांच्याकडून हप्ते वसूल करणारे तथाकथित नेते-कार्यकर्ते कोण? असा उद्विग्न सवालही त्यांनी केला. 

अत्यंत रहदारीच्या समस्यांमुळे व शहरात वारंवार होत असलेल्या प्रचंड कोंडीमुळे पुन्हा एकदा अतिक्रमणे हलविली जात आहेत. काही काळानंतर पुन्हा काही माफिया पुढारी याच जागा बळकावतील व अनधिकृतपणे हप्ते वसुली करतील, नगरपरिषद अधिकार्‍यांवर दहशत करतील. मात्र हातावर पोट भरणारे छोटे व्यावसायिक हप्ते वसुलीबद्दल बोलू शकणार नाही. पुन्हा असे होऊ नये यासाठी खर्‍या गरीब व्यावसायिकांसाठी हॉकर्स झोन उभारणे गरजेचे आहे. यानंतर पुन्हा विस्थापितांच्या प्रश्नाचे कुणीही राजकारण करू नये. यासाठी प्रशासक तथा मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना विनंती आहे की, खर्‍या गरीब व्यावसायिकांची यादी करून त्यांना पुन्हा उठविले जाणार नाही अशा योग्य ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करावा. याचबरोबर शहरातील दोन-तीन जागांवर वाहनतळ व्यवस्था करून शहरातील रहदारी सुरळीत झाली तर सर्व व्यवसाय चांगल्या पद्धतीने होतील. भंगारचा व्यवसाय करणारे, मटण विक्रेते यांची सोय करण्यात आली, तशीच व्यवस्था इतरही व्यवसायिकांची करण्याचे प्रयत्न करावे.

कोपरगावच्या बस स्थानकाभोवती किमान 200 गाळे होऊ शकतात. तशी मागणी देखील परिवहन मंत्र्यांकडे केलेली आहे. राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी प्रयत्न केल्यास तेही गाळे होऊ शकतात. स्वतः अतिक्रमणे करून पुन्हा नेतेगिरी करणारेच अतिक्रमण हटाव मोहिमेस कारणीभूत आहेत. त्यासाठी टपरी माफियांचे चाळे कायमस्वरूपी बंद करायचे असतील तर नगरपरिषदेने हॉकर्स झोन उपलब्ध करून द्योवत. याकामी नगरपरिषद प्रशासक, पोलीस निरीक्षक, तहसीलदार यांनी वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे.

- विजय वहाडणे (माजी नगराध्यक्ष-कोपरगाव)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत