देवळाली प्रवरा/वेबटीम:- राजर्षी शाहू महाविद्यालय देवळाली प्रवराच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्र विभागाच्या वतीने दि. ० ८ मा...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
राजर्षी शाहू महाविद्यालय देवळाली प्रवराच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्र विभागाच्या वतीने दि. ० ८ मार्च, २०२२ रोजी सकाळी ठीक ११:०० वा. जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. सतीष कटके हे होते. त्यांनी ‘महिला सक्षमीकरण काळाची गरज’ या विषयावरती व्याख्यान दिले.त्यांनी आपल्या व्याख्यानातून महिलांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला-कौशल्य, बुद्धिमत्ता, आर्थिक व सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे असे सांगितले. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी निर्णयात्मक सहभाग घेवून आपल्या बरोबरच देशाची प्रगती केली पाहिजे तसेच महिलांनी सबल होणे महत्वाचे आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. राजू साळवे हे होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये प्रा. अश्विनी चंगेडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. बाळासाहेब फुलमाळी यांनी केले. व उपस्थितांचे आभार प्रा. अविनाश मेहेत्रे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.बापू खिलारी, प्रा.प्रशांत मुर्तडक, प्रा.महेश निंबाळकर, प्रा.महेश कुलकर्णी, आदि प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.स्वाती हापसे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम व्यवस्थित पार पडला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत