देवळाली प्रवरा/वेबटीम:- उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या राज्यांत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळविल्याबद्दल देवळाली प्रवरा शहरात...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या राज्यांत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळविल्याबद्दल देवळाली प्रवरा शहरात भाजपच्यावतीने फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला.
माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत देवळाली प्रवरा डेपो भागात स्व. अण्णासाहेब पाटील कदम यांचे पुतळ्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून डिजेच्या निनादात आनंद साजरा करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष तथा नगर दक्षिण युवा मोर्चाचे अध्यक्ष सत्यजीत कदम, ज्येष्ठ नेते मच्छीन्द्र कदम, सोपान भांड, शहाजी कदम, माजी नगरसेवक सचिन ढुस, ज्ञानेश्वर वाणी, भारत शेटे, भाजप शहराध्यक्ष अजित चव्हाण, अमोल कदम, भारत शेटे, राजेंद्र ढुस,राजेंद्र चव्हाण, दिलीप मुसमाडे, भाऊसाहेब वाळुंज, आझाद मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप कदम, मोहसीन शेख, सतीश वने, सचिन कोठुळे, रामेश्वर तोडमल, सचिन शेटे, मनोज शिंदे, अविनाश मुसमाडे, शरद वाळके, सुयोग सिनारे, संतोष हारदे, अनिल कदम, रविकिरण ढुस, रोहित कदम, किरण सिनारे, आकाश गडाख, राहुल गुलदगड, प्रसाद ढुस, अझर शेख, अभय चव्हाण, संतोष वाळुंज, गौतम भागवत, किशोर तोडमल, साईनाथ भागवत, उमर इनामदार , चेतन कदम, रवींद्र दळवी, मंगेश ढुस, ओंकार लांडे , विजय भिंगारे, दादा मुसमाडे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित भाजप कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत