राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी येथील डॉ.तनपुरे कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांनी ग्रॅच्युईटी व फंडच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्याचा इशा...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी येथील डॉ.तनपुरे कारखान्याच्या सेवानिवृत्त कामगारांनी ग्रॅच्युईटी व फंडच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र डॉ.तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.
डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी यांनी दिनांक २१ मार्च रोजी आपल्या विविध मागणीसाठी कारखाना प्रशासनास धरणे आंदोलन करणार असल्याचे कळविले होते.
परंतु कारखान्याचे मार्गदर्शक खासदार डॉ. सुजय विखे यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे व्हाईस चेअरमन दत्तात्रय ढुस, संचालक मंडळ व प्र. कार्यकारी संचालक बी.एन. सरोदे यांच्या वतीने कारखान्याचे पर्सोनेल मॅनेजर मा. श्री. डी. यु. खर्डे साहेब, ऑफीस सुपरिंटेंडेंट श्री. गजानन निमसे पा., युनियनचे उपाध्यक्ष मा. श्री. अर्जुन दुशिंग पा. यांनी सेवानिवृत्त कर्मचारी यांचे निवेदन स्विकारले व चर्चेद्वारे वाटाघाटी करून सेवानिवृत्त कर्मचारी यांना आंदोलनापासून परावृत्त केले.
त्यानंतर कारखाना प्रशासनाने सेवानिवृत्त कर्मचारी यांची मागणी मान्य केल्याचे पत्र कारभारी खुळे, रफीक सय्यद, भाऊसाहेब तांबे, सोपान घोरपडे, सोमनाथ गागरे, भास्कर कोळसे, सोपान कोहकडे, व इतर सेवानिवृत्त कर्मचारी यांना दिले.
दरम्यान चेअरमन नामदेव ढोकणे यांनी दिलेल्या लेखी आश्वासन पत्रात म्हंटले की, कारखाना कामगारांनी थकीत पगार मिळणेसाठी काम बंद आंदोलन केलेले कारखाना माहे सप्टेंबर २०१४ पासून बंद होता. तसेच कारखान्यावर मार्च २०१५ रोजी साखर आयुक्त, पुणे यांनी प्रशासक नेमणुक केल्याने कारखान्याचा सन २०१४-१५, २०१५-१६ व २०१६-१७ गळीत हंगाम बंद होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले.
कारखान्याची जुन २०१६ रोजी संचालक मंडळाची निवडणुक होवून दि. २४ जुन २०१६ रोजी नवीन संचालक मंडळ निवडून आले. परंतु मशीन दुरुस्ती व आर्थिक अडचणी असलेने सन २०१७-१८ गळीत हंगाम उशीरा सुरु झाला. त्यामुळे कारखान्याला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला. तसेच कारखाना जिल्हा बँक, अहमदनगर यांचेकडे रु.९० कोटी कर्जापोटी तारण असलेने इतर कोणत्याही बँकेकडून आर्थिक उपलब्धता होत नव्हती. त्यामुळे कामगारांची चालू रोजी रोटी सुध्दा देणे कारखान्याला कठीण होत होते. आपण मागणी केलेली सेवानिवृत्त कामगारांच्या मॅच्युईरीटीबाबत व्यवस्थापक मंडळ पुढील सिझनमध्ये प्रॉव्हिडंड फंडाबाबत आपण केलेल्या मागणीची पुर्तता केली जात असून दि. ३१ मार्च २०२२ अखेर कारखाना ६ कोटी रुपये रकमेचा भरणा प्रॉव्हिडंट फंड खाती जमा होतील व ३१ मे अखेर प्रॉ. फंडचा संपुर्ण रकमेचा भरणा करण्याचा प्रयत्न करणार आहे.
त्याचप्रमाणे आपले रजेचे पगार १५ व १८% पगार वाढीचा फरक तसेच थकीत पगार याबाबत आर्थिक नियोजन करुन व आपणासमवेत सर्व बाबींची सविस्तर चर्चा करुनच व न्यायप्रविष्ट असलेल्या बाबींचा योग्य त्या तडजोडीबाबत वाटाघाटी करुनच योग्य तो निर्णय घेण्यात येईल. आपण सध्या सिझन चालू असल्याने कारखाना कामकाजात चालु गळीत हंगामात बाधा येईल अशा प्रकारची कोणतीही कृती किवा धरणे आंदोलन गेटवर करु नये असे चेअरमन ढोकणे यांनी म्हटले आहे. सेवानिवृत्त कामगारांनी चेअरमन नामदेव ढोकणे यांच्या लेखी आश्वासनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन आंदोलन मागे घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत