दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात गुंडांची टोळी राहुरी फॅक्टरी परिसरात जेरबंद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात गुंडांची टोळी राहुरी फॅक्टरी परिसरात जेरबंद

राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या कुख्यात दरोडेखोरांच्या टोळीस राहुरी पोलीसांनी जेरबंद केले आहे.या आरोप...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-


दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्या कुख्यात दरोडेखोरांच्या टोळीस राहुरी पोलीसांनी जेरबंद केले आहे.या आरोपिंमध्ये राहुरी तालुक्यातील गुहा येथील तिघांचा समावेश आहे 



याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, नगर-मनमाड मार्गावर  राहुरी कारखाना नजीकच्या गुंजाळ नाका परिसरातील एच.पी पेट्रोल पंप परिसरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दरोडेखोरांची टोळी असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रतापराव दराडे यांना समजताच आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास पोलिस निरीक्षक प्रतापराव दराडे, पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील, पोलीस कॉन्स्टेबल आजिनाथ पाखरे, पोलीस नाईक प्रवीण अहिरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी पोहोचून सहा दरोडेखोरांना पकडले.


यामध्ये समीर हंसराज शेख( वय 39 राहणार गुहा, तालुका राहुरी),कय्युम अब्बास शेख( वय २८,राहणार लोहगाव पुणे), गणेश नामदेव कोरडे (वय ३५, राहणार हिंगणगाव ता.नगर ),अजय जॉन ओहोळ(वय 25 राहणार, गुहा ता.राहुरी) दिपक रामनाथ पवार (वय १९,राहणार नांदगाव ता.नगर), अजीज अकबर शेख वय-३५, रा.गुहा ता.राहुरी) यांना दोन विना क्रमांकाच्या मोटारसायकल, एक लोखंडी सत्तुर, लोखंडी गज, मिरचीपूड, वस्तारा व चाकू अशा एकूण ९० हजार रुपयांच्या  मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.


 राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस नाईक प्रवीण आहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवी कलम ३९९,४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी हे करत आहे. 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांच्यासह पथकाने केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत