दैनंदिन जीवनात अश्या काही घटना घडतात की त्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात. माणूसच माणसाच्या मुळावर उठला आहे , ही भयानक वस्तुस्थिती आपल्...
दैनंदिन जीवनात अश्या काही घटना घडतात की त्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात. माणूसच माणसाच्या मुळावर उठला आहे , ही भयानक वस्तुस्थिती आपल्याना सध्याच्या काळात दिसून येतीय आणि ती फक्त जातिवादामुळे.
भारतामध्ये जातीभेद कमी होऊन जातिवादाला चालना मिळाली असही म्हणता येईल.
नुकतेच घडलेल्या तीन ते चार घटना आपल्यासमोर आहे कुणी महापुरुषांच्या पुतळ्यावरून भांडतय तर कुणी हिजाबवरून. हिजाब प्रकरणावरून दुसऱ्या देशाने भारतावरती टीका केली. ती टीका खूप लाज्यस्पद होती. आपल्या कुटुंबावर कुणी टीका केली तर आपण सहन नाही करून घेत तसच भारताला आपणही आपलं कुटुंब समजायला हवं. ज्या शाळेत , कॉलेजमध्ये आपण ज्ञान प्राप्त करण्यास जातो त्या ठिकाणी जातिवाद घडण म्हणजे भयानक वस्तुस्थिती. असच मनात आले की,
"अगर पंछिओ को पता होता की
उनका मजहब कौनसा है
तो आसमासे खून की बारीशे होती..."
ह्या घडलेल्या प्रकरणावरून राहुरी पोलिस स्टेशन मध्ये खूप छान संदेश दिला,
जातीयवाद धर्मिकवादला नका देऊ थारा!
माणूस म्हणून जगू हाच नवा नारा!
खरंतर प्रताप दराडे सरांचं कौतुक करावे तेवढं कमीच...!!!!
राजकारणी लोक स्वतःच्या हितासाठी जातिवादला हवा घालतात. भारतात जातीच राजकारण खूपच भयंकर आहे. राजकारण करायचे असेल तर करा पण त्यात धर्म आणू नका कारण पुढची पिढी आपल्याना बघून घडणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, ज्योतीबाराव फुले, डॉ. अब्दुल कलाम ह्या महान पुरुषांना समाज फक्त डोक्यावरती मिरवतो पण त्यांचे विचार कधी डोक्यात घेत नाही. त्यांच्या जयंती थाटामाटात साजरी करतात पण कडू सत्य अस आहे की, समाजाने अस मानून घेतलय छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बहुजनांचे, ज्योतीबाराव फुले माळी समाजाचे.
त्याना कधी वाटलं ही नसणं की आम्हाला येणारी पिढी जातीवरून लक्षात ठेवणं.
सर्वधर्म सर्वश्रेष्ठ आहेत. त्याची तुलना करायचा अधिकार आपल्याना नाही असं तरी मला वाटतंय. तुम्ही तुमच्या जातीला महत्व द्या पण दुसऱ्या जातीलाही कमी समजू नका धर्माची सरळ व्याख्या कोणत्याही आत्माला आपल्यामुळे दुःख न होणे हाच धर्म आहे.
आपल्या मनातील प्रतिमा , आपली धोरणे आणि आपले विचार बाजूला ठेवून आपण जर महापुरुष अभ्यासले तर निश्चितच एक बहुआयामी आणि आगळे वेगळे महापुरुष भेटतील मग आपल्यातील नानातऱ्हाचे विचार बाजूला पडतील आणि विचारांना वेगळी चालना मिळेल.
जयंती साजरी करायची असेल तर नक्की करा पण हातात झेंडे घेऊन जातिवादला बळी पडू नका.
जयंतीला शिवचरित्र, संविधान, सत्यशोधक महात्मा फुले, डॉ. अब्दुल कलाम यांचे पुस्तक वाटा जेणेकरून पुढच्या पिढीला हे महापुरुष कळतील. आपण जर जातिवाद करत असलो तर पुढच्या पिढीला कधी नाही कळणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,छत्रपती शिवाजी महाराज.
संत ज्ञानेश्वर महाराज असू या गौतम बुद्ध किंवा मुहम्मद पैगंबर यांनी सगळ्यांनी जगात समता, शांतता , बंधुता पसरण्याचे काम केलं. आपल्या पवित्र ग्रंथांतून त्यांनी जगाला चांगले संदेश दिले आणि आपण त्यांच्यावरून भांडतोय, जातिवाद करतोय, हे कितपत योग्य आहे?
"जात अशी आहे की ती कधी जातच नाही"
समाजाला कधी एका वेश्याची, हिजाड्याची , गरिबांची जात लोकांना महत्वाची नाही वाटत त्याचही कौतुकच वाटत मला.
एवढंच काय गैरसंबधातून होणार बाळ हे आश्रमाच्या पायरीवरती ठेवून निघून जातात त्याला कधी जातीच स्टिकर लावत नाही. मग का लोक जातिवादला बळी पडतात काय माहित.
ह्यावरून ऐक गोष्ट आठवली, एक वयस्कर वृद्ध बागेत बसलेले होते आयुष्याचे उन्हाळे-पावसाळे बघून. बागेच वातावरण एकदम छान होत अगदी मनाला मोहणारा पक्षाचा आवाज येत होता . त्या बागेत तीन मुले खेळत होती. त्यांनी कागदाचे झेंडे बनवले होते. त्याला भगवा, हिरवा , निळा झेंडा बनवला होता आणि प्रत्येकजण आपल्या झेंडा चांगला आहे असं म्हणत होत बोलता बोलता त्यांची भांडण चालू झाली. ते बघून त्या वृद्धांला वाईट वाटलं ते त्यांच्या जवळ गेले आणि म्हणाले हे सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या कुणी. त्यावर त्यांचं एकच उत्तर एकच होत आम्हाला कुणी सांगितलं नाही पण घरात बोलल जात , आम्ही येताना बघतो. त्या वृद्ध व्यक्तीने त्यांच्या हातामधून झेंडे घेतले आणि आकाशाकडे वरती केले भगवा, हिरवा आणि निळा . त्यावरती ते वृद्ध बोलले सांगा कोणता झेंडा होतंय. त्यात ते तिघेही बोलले भारताचा .वृद्ध बोलले कसकाय?
त्यावरती त्या मुलांनी खुप छान उत्तर दिले भगवा, हिरवा आणि निळा आणि आकाशाचा पांढरा रंग सगळ्याच मिळून भारताचा झेंडा तयार होतो.
त्यावरती वृद्ध बोलले हे सगळे रंग एकत्र येऊन किती छान वाटतात तसे आपण पण एकत्र मिळून राहिलो तर किती छान होईल. भारत हा सर्वधर्मीय देश आहे.
त्या मुलांनी आजोबांना घट्ट मिठी मारली आणि म्हणाले आपण सगळे एकच आहोत आणि परत ते एकत्र खेळू लागले.
खेळा , माणसाला माणसारखं वागवा, मनसोक्त जागा पण जातिवादला थारा देऊ नका .....
मनिषा रंजना बाळासाहेब लांबे✍🏻
कोणत्याही टिप्पण्या नाहीत