कोपरगाव(वेबटीम) शासकीय कार्यालयात येणाऱ्या मतदार संघातील नागरिकांना येणाऱ्या अडी-अडचणी समजून घेवून या अडीअडचणी विविध शासकीय कार्यालयांच्या ...
कोपरगाव(वेबटीम)
शासकीय कार्यालयात येणाऱ्या मतदार संघातील नागरिकांना येणाऱ्या अडी-अडचणी समजून घेवून या अडीअडचणी विविध शासकीय कार्यालयांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत चर्चा घडवून सोडविण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे सोमवार (दि.११) रोजी दुपारी ०३:०० वा. कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेणार आहेत अशी माहिती ना.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
मतदार संघातील बहुसंख्य नागरिकांचे अनेक शासकीय कार्यालयात विविध प्रकारची कामे असतात. त्या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक, अपंग व्यक्ती, विधवा महिला, जेष्ठ नागरिक, माजी सैनिक, शेतकरी अशा सर्वच स्तरातील सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात कामानिमित्ताने अनेकवेळा जावे लागते.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक, महिला व जेष्ठ नागरिकांच्या समस्या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांपुढे मांडून हे प्रश्न लवकरात लवकर कसे निकाली निघतील यासाठी ना. आशुतोष काळे यांनी निवडून आल्यापासून जनता दरबार घेत आहे. मागील दोन वर्षापासून वैश्विक कोरोना संकटामुळे संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध घालण्यात आले होते. मात्र कोरोना संकटाची तीव्रता कमी झाल्यामुळे जवळपास सर्वच निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे काही महिन्यांपासून ना. आशुतोष काळे यांनी पुन्हा आपले जनता दरबार सुरु केले आहेत. या जनता दरबारासाठी सर्व नागरिकांनी आपल्या अडचणी व तक्रारी लेखी स्वरूपात मांडाव्या जेणेकरून कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न निकाली निघतील त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ना.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत