बार्टीच्या समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात समता सप्ताहचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बार्टीच्या समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात समता सप्ताहचे आयोजन

  अहमदनगर(वेबटीम) डाॅ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे समतादूत प्रकल्प तर्फे संपुर्ण जिल्ह्यात डाॅ बाबासाहेब आंबेडक...

 अहमदनगर(वेबटीम)



डाॅ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे समतादूत प्रकल्प तर्फे संपुर्ण जिल्ह्यात डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 7 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान सामाजिक  समता सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे. समतादूत मार्फत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजामध्ये रूजविण्यासाठी विविध प्रबोधन कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले आहे. 



सप्ताह ची सुरूवात जागतिक आरोग्य दिनानिमीत्त महिलांची मोफत तपासणी,  तसेच महिला सक्षमीकरण बाबत चे  विचार, पत्रकारांचा सन्मान,जेष्ठ नागरिकांसाठी, महिला विद्यार्थी साठी सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन तर्फे असणारे विविध योजना, दहा तास वाचन कार्यक्रम, निबंध ,वकृत्व स्पर्धा   महात्मा फुले जयंती निमित्त प्रबोधन कार्यक्रम, रक्तदान शिबिर विविध मान्यवर चे    प्रबोधन कार्यक्रम ,स्वच्छतेचा संदेश, युवक युवती ना उद्योग व्यवसाय च्या दृष्टीने मार्गदर्शन  असे अनेक उपक्रम या सप्ताहात  घेऊन लोकांमध्ये जनजागृती साठी प्रयत्न समतादूत करत आहे. या सप्ताहाच्या दृष्टीने राहुरी तालुक्यातील विविध ग्रामीण व शहरी भागात समतादूत एजाज पिरजादे यांनी कार्यक्रम चे आयोजन केले आहे. वाचन कार्यक्रम मध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करावे तसेच सर्वच कार्यक्रम मध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे असे आव्हान यावेळी समतादूत यांनी केले आहे.


डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सप्ताह वैचारिक पध्दतीने साजरी करण्यासाठी या समता सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे. 

  समता सप्ताह साजरा करण्यासाठी    समाजकल्याण  सहाय्यक आयुक्त मा.श्री.राधाकिसन देवढे साहेब   समतादूत विभाग प्रमुख तथा उपायुक्त उमेश सोनवणे , प्रकल्प व्यवस्थापक नितीन सहारे सर तसेच बार्टीचे अहमदनगर जिल्हा समतादूत प्रकल्प अधिकारी मा श्री दिलावर सय्यद सर आदींचे मार्गदर्शन समतादूत यांना मिळत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत