आंबी(वेबटीम) केशव गोविंद विद्यालय व ज्यनिअर कॉलेज बेलापूर खुर्दच्या आंबी भाग शाळेचे शिक्षकेत्तर कर्मचारी तथा जेष्ठ पत्रकार विश्वनाथ गोकुळदास...
आंबी(वेबटीम)
केशव गोविंद विद्यालय व ज्यनिअर कॉलेज बेलापूर खुर्दच्या आंबी भाग शाळेचे शिक्षकेत्तर कर्मचारी तथा जेष्ठ पत्रकार विश्वनाथ गोकुळदास जाधव हे आपल्या प्रदीर्घ सेवेतून शिपाई पदावरून सेवानिवृच होत आहेत. त्यांनी आपल्या सेवेत केलेल्या कार्याचा गौरव म्हणून आंबी भाग शाळेत त्यांचा सपत्नीक, सहकुटुंब सेवापूर्ती गौरव समारंभनुकताच संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष कृषीमित्र सुरसिंगराव पवार हे होते. प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सत्कारमूर्ती जाधव दाम्पत्याचा विद्यालयाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान व्हा. चेअरमन दत्तात्रय दुस, संचालक बाककृष्ण कोळसे, केशवराव माधवराव कोळसे, माजी संचालक शिवाजीराव कोळसे, ज्ञानेश्वर कोळसे, रमेश वारुळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे जेष्ठ संचालक वसंतराव कोळसे, महिपती महाराज देवस्थानचे अध्यक्ष राजेंद साबळे, तालुका देखरेख संघाचे माजी अध्यक्ष भागवत कोळसे, आंबीच्या सरपंच संगीताताई साळुंके, अंमळनेरच्या सरपंच अरुणाताई जाधव, माजी सरपंच सतीष जाधव, रोहण जाधव, केसापूरचे सरपंच बाबासाहेब पवार, साई प्रवरा कृषी कंपनीचे संचालक दादापाटील मेहेत्रे, माजी चेअरमन बापूराव जाधव, विष्णू जाधव, कामगार पोलीस पाटील बाळासाहेब लोंढे, सुरेश जाधव, शिवसेनेचे विठ्ठलपंत कोळसे, लक्ष्मण जाधव, विठ्ठल एस. कोळसे,सेवानिवृत्त मुख्याध्यापक कारभारी आढाव, विकास जोशी, गोरक्षनाथ सालबंदे, हरिभाऊ वाकचौरे, अर्जुन डुकरे, अशोक रोकडे, मधुकर दिवेकर, पुंजाजी टेके, लुकस संसारे, पाटील सर, रामभाऊ कुऱ्हे, भास्कर कानवडे, पोपट खपके, पै. सुनिल खपके, मनोहर साळुंके, डॉ. अजित सालबंदे, अण्णासाहेब कोळसे, उत्तमराव औताडे, बाळासाहेब डुकरे, धनगर समाज संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे, कृषीमित्र रायभान जाधव, पत्रकार संदिप पाळंदे, अशोक साळुंके, विद्यालयाचे प्राचार्य सोपान मगर, उपप्राचार्य अर्जुन गाडे, माध्यमिक सोसायटीचे संचालक संजय कोळसे, जेष्ठ शिक्षक पंढरीनाथ शिंदे, बाळासाहेब हारदे, सर्जेराव चव्हाण, प्रकाश राजुळे, शिक्षक प्रतिनिधी प्रशांत होन, उदय गायकवाड, श्री. काळे, राजेंद्र खरात यांसह आदि शिक्षक-शिक्षकेतर सेवक वृंद, ग्रामस्थ, विद्याथी, पत्रकार, आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
या कार्यक्रमासाठी रविकिरण गायकवाड, प्रदीप खपके, मिना दंडवते, मिरा आढाव, माधुरी येवले, प्रसाद कदम, यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रकाश राजूळे यांनी केले तर शेवटी आभार विनोद जुंदरे यांनी मानले. यावेळी जाधव कुटुंबियांकडून शाळेतील विद्यार्थ्याना गोड जेवण देण्यात आले होते.
आंबी : केशव गोविंद विद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी व पत्रकार विश्वनाथ जाधव यांचा सेवापूर्ती निमित्ताने सपत्नीक सन्मान करताना मान्यवर. (छाया : नानासाहेब कोळसे)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत