कोपरगाव / प्रतिनिधी कोपरगाव शहरात वाहतुकीस अडथळा ठरण्यास कारणीभूत ठरणार्या वाहनांवर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व शहर पोलीस निरीक्षक ...
कोपरगाव / प्रतिनिधी
कोपरगाव शहरात वाहतुकीस अडथळा ठरण्यास कारणीभूत ठरणार्या वाहनांवर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करुन इशारा दिला आहे. सोमवारी (ता.25) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास विविध ठिकाणी वाहतुकीस अडथळा ठरणार्या तीन वाहनांवर कारवाई करुन गुन्हे दाखल केले आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील सुदेश थिएटर समोर महिंद्रा कंपनीची बोलेरो जीप (तात्पुरता क्रमांक एमएच15, टीसी. 0065) उभी करुन इतर वाहनांसह नागरिकांना धोका ठरेल अशा अवस्थेत उभी केली. या प्रकरणी नीलेश उत्तम चव्हाण (रा.मढी बु., ता.कोपरगाव) याच्या विरोधात गुरनं.95/2022 भादंवि कलम 283, मोटार वाहन कायदा कलम 39/192(1) नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरी कारवाई ठकराल क्लॉथ सेंटर समोर रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनावर केली आहे. रवींद्र नारायण गिधाड (वय 41, रा.पिंपळवाडी, ता.राहाता) याने रस्त्यावर टाटा कंपनीची झीप गाडी (क्र.एमएच.17, बीवाय.5497) ही उभी करुन निघून गेला. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला. या प्रकरणी रवींद्र गिधाड याच्याविरोधात गुरनं.96/2022 भादंवि कलम 283, आरआर 3/177 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रमाणेच तिसरी कारवाई ठकराल क्लॉथ सेंटर समोरच केली. अरुण रंजाबा निरगुडे (वय 47, रा.संवत्सर, ता.कोपरगाव) हे मारुती सुझुकी कंपनीची स्वीफ्ट कार रस्त्यावर लावून निघून गेले. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. वरील तिन्ही प्रकरणी पोलीस नाईक दिगंबर शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. आर. एस. कांबळे हे करत आहे.
दरम्यान, शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर वाहने उभी करुन वाहतुकीस व नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत