राहुरी/वेबटीम:- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने इस्लामपूर येथे आयोजित संवाद यात्रेच्या सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याचा राह...
राहुरी/वेबटीम:-
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने इस्लामपूर येथे आयोजित संवाद यात्रेच्या सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याचा राहुरी येथील ब्राम्हण संघटनांनी निषेध नोंदवत मिटकरी यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी तहसीलदार एफ.आर शेख व पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
इस्लामपूर येथे संवाद यात्रेच्या निमित्ताने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत हजारो जनसमुदायासमोर आमदार मिटकरी यांनी काही स्तोत्र म्हणून दाखवत टिंगल उडविण्याचा प्रयत्न केला. मिटकरी यांच्या या कृतीचा व त्यांच्या वक्तव्याचा देशभरात निषेध केला जात असून राहुरीत त्याचे पडसाद उमटले.
मंगळवारी राहुरी पोलीस व महसूल प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हंटले की, मिटकरी यांनी बेताल व हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारे वक्तव्य केल्याचे यावेळी सांगण्यात आले. ते ही कृती करत असताना ना.जयंत पाटील व ना.धनंजय मुंडे व्यासपीठावर होते. त्यांनी मिटकरी यांना थांबवायला हवे होते, मात्र त्यांनी हसून त्यांना एकप्रकारे पाठिंबा दिला. मिटकरी यांनी तातडीने जाहीर माफी मागावी व राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा राहुरी येथील ब्राम्हण संघटनांनी दिला आहे.
यावेळी राहुरी तालुकाध्यक्ष नितीन काळे, उपाध्यक्ष विवेक कांबळे, खजिनदार प्रमोद कुलकर्णी,सुनील कुलकर्णी ,रंगनाथ पांडे, विवेक कांबळे, देविदास देशपांडे ,मुकुंद गोडबोले ,प्रकाश नवले ,प्रमोद कुलकर्णी, सचिन दिवे, बाळकृष्ण खरे ,अभिजित जोशी, अभिषेक जोशी ,विनोद गोंधळी ,भगवान ठोंबरे, प्रवीण जोशी,विजय जोशी ,समर्थ काळे, प्रवीण नवले, दिनेश औटी, सुदर्शन क्षीरसागर ,गौरव शिरसागर, विश्वास क्षीरसागर आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत