राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे एका ६५ वर्षीय महिलेस मारहाण करून तिच्या सुनेचा विनयभंग केल्याप्रकरणीराहुरी पो...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे एका ६५ वर्षीय महिलेस मारहाण करून तिच्या सुनेचा विनयभंग केल्याप्रकरणीराहुरी पोलीस ठाण्यात आरोपी चंद्रकांत दोंदे,विकास दोंदे, मुसमाडे (पूर्ण नाव माहित नाही) रा.देवळाली प्रवरा ता.राहुरी व अन्य ४ अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ६५ वर्षीय महिलेने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हणले की, देवळाली प्रवरा येथे आरोपी चंद्रकांत दोंदे, विकास दोंदे व अन्य ४ ते ५ गैरकायद्याची मंडळी टेम्पो घेऊन आले. माझ्या घरी अनधिकृत पणे प्रवेश करून मला, माझा मुलगा व सुनेस मारहाण करु लागले. याचवेळी माझ्या सुनेस काठीने बेदम मारहाण करून तिची छाती दाबून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
याबाबत सदर महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली असता चंद्रकांत दोंदे,विकास दोंदे, मुसमाडे (पूर्ण नाव माहित नाही) रा.देवळाली प्रवरा ता.राहुरी व अन्य ४ अनोळखी इसमाविरुद्ध भा.दं.वि.कलम ३५४,३२४,३२३,४५२,१४३,१४७,१४८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास राहुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.पी.बी.शिरसाठ हे करत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत