राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील दोंदे बंधूंना लाकडी दांड्याने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी द...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील दोंदे बंधूंना लाकडी दांड्याने मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी देवळाली प्रवरा येथील सतीश पठारे व त्याची आई (नाव माहित नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत चंद्रकांत संभाजी दोंदे वय २८ (रा.देवळाली प्रवरा) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हणले की, दिनांक २५ एप्रिल रोजी ७.३० वाजेच्या सुमारास मी,माझा भाऊ विकास व प्रसाद मुसमाडे व सुनील मिसाळ असे दोन कामगार सतीश पठारे याच्या घरी फ्रीज आणण्यासाठी टेम्पो मध्ये गेलो असता आम्हाला बघून सतीश पठारे शिवीगाळ करू लागला तुम्ही महाराचे लोक माझ्या दारात का आले असे म्हणून त्याने हातातील दांडा माझा भाऊ विकास ह्याच्या उजव्या पायावर मारून गंभीर जखमी केले याचवेळी मी सोडवा सोडव करण्यासाठी गेलो असता त्याच दांड्याने माझ्या डोक्यात व डाव्या हातावर मारून मलाही जखमी केले सतीश पठारे याच्यासह त्याची आई इनेही मला व माझ्या भावास जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करून टेम्पोचे नुकसान केले.
दरम्यान याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात चंद्रकांत संभाजी दोंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सतीश पठारे व त्याची आई यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३२६,३२४,३२३,४२७,५०४,५०६ अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३(१)(S)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके हे करत आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत