कोपरगाव प्रतिनिधी- कोपरगाव तालुक्यातून एन.एच. १६० हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे. या महामार्गासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून त्...
कोपरगाव प्रतिनिधी-
कोपरगाव तालुक्यातून एन.एच. १६० हा राष्ट्रीय महामार्ग जात आहे. या महामार्गासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून त्यांना योग्य मोबदला देण्यात आला आहे. परंतु शासकीय जागेवर वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना भरपाईपासून वंचित ठेवण्यात आले होते. त्याबाबत श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केलेला पाठपुरावा व केलेली शिष्टाई यशस्वी झाली असून शासकीय जागेवर राहणाऱ्या तब्बल ४० नागरिकांना २ कोटी २ लाख ५६ हजार ५९८ रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे.
कोपरगाव तालुक्यातून राष्ट्रीय महामार्ग एन.एच.१६० जात असून या महामार्गामुळे प्रकल्पबाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना व अनेक नागरिकांना त्यांच्या जमिनीचा व होणाऱ्या नुकसानीचा योग्य मोबदला देण्यात आला आहे. मात्र जे नागरिक शासकीय जागेवर वास्तव्यास होते, ज्यांचे त्या जागेवर उद्योग व्यवसाय सुरु होते त्या जागा संपादित करण्यात आल्या होत्या मात्र त्या जागा सबंधित नागरिकांच्या नावावर नसल्यामुळे त्यांना शासनाकडून भरपाई मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. यामध्ये देर्डे कोऱ्हाळे व चांदेकसारे येथील अनेक नागरिकांचा समावेश होता. त्याबाबत या नागरिकांनी ना.आशुतोष काळे यांची भेट घेवून आम्हाला न्याय मिळवून द्यावा असे साकडे घातले होते.
प्रकल्पबाधित नागरिकांची परिस्थिती समजावून घेत ना. आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रातांधिकारी गोविंद शिंदे, एन.एच.१६० चे प्रोजेक्ट डायरेक्टर साळुंके यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. हे नागरिक जरी शासकीय जागेवर राहत असले तरी एन.एच.१६० मुळे या नागरिकांचे हक्काचे घर व व्यवसाय हिरावले जाऊन या नागरिकांच्या होणाऱ्या नुकसानीचा विचार करावा. जागा जरी शासनाची असली तरी त्या जागेवर उभ्या असलेल्या इमारतींचा रीतसर आकारला जाणारा शासकीय कर हे नागरीक आजपर्यंत अदा करीत आलेले आहेत. राष्ट्रीय महामार्ग एन.एच.१६० मुळे शासकीय जागेवरील ज्या नागरिकांचे घर, व्यवसाय बाधित झाले आहेत. त्या नागरिकांच्या होणाऱ्या नुकसानीचे मुल्यांकन करून त्याप्रमाणात या नागरिकांना भरपाई देण्यात यावी यासाठी ना. आशुतोष काळे आग्रही होते व शासनदरबारी पाठपुरावा करीत होते. त्या पाठपुराव्याला मिळालेल्या यशातून भरपाईपासून वंचित असलेल्या नागरिकांना २ कोटी २ लाख ५६ हजार मोबदला देण्यात आला आहे. यामध्ये देर्डे कोऱ्हाळे व चांदेकसारे येथील ४० नागरिकांचा समावेश आहे. आम्हाला न्याय मिळवून देवून नागरिकांना भरपाई मिळवून दिल्याबद्दल भरपाईपासून वंचित असलेल्या नागरिकांनी ना. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.
ना. आशुतोष काळेंच्या रूपाने देवच धावून आला...................
:- विकासाच्या दृष्टीने दळणवळण वाढावे यासाठी कोपरगाव तालुक्यातून एन.एच.१६० नवीन राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात आला. त्यासाठी संपादित करण्यात आलेल्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला मिळाला कारण संपादित करण्यात आलेले क्षेत्र व इतर मालमत्ता संबंधित प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या नावावर होत्या. एन.एच.१६० साठी क्षेत्र व मालमत्ता आमच्या देखील संपादित करण्यात आल्या मात्र आम्ही शासकीय जागेवर वास्तव्यास असल्यामुळे आम्हाला भरपाईपासून वंचित ठेवण्यात आले होते. त्याबाबत आम्ही वंचित प्रकल्पबाधित नागरिकांनी आमची कैफियत ना.आशुतोष काळे यांच्यापुढे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे साकडे घातले. आमच्या होणाऱ्या नुकसानीची त्यांनी गांभीर्याने दखल घेवून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रातांधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम अभियंता व एन.एच.१६०चे प्रोजेक्ट डायरेक्टर साळुंके यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आम्हाला न्याय मिळाला असून त्यांनी आमची व आमच्या कुटुंबाची भविष्यात होणारी परवड थांबवली.आमच्या लेकरा-बाळांचा त्यांना आशीर्वाद मिळणार असून ना.आशुतोष काळेंच्या रूपाने देवच धावून आला आहे. - वंचित प्रकल्पबाधित नागरिक.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत