आरडगाव येथे आदिवासी विकास विभागाकडुन खावटी योजनेअंतर्गत किराणा किटचे वाटप - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आरडगाव येथे आदिवासी विकास विभागाकडुन खावटी योजनेअंतर्गत किराणा किटचे वाटप

  राहुरी(वेबटीम) आदिवासी विकास योजने अंतर्गत राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे आदिवासी कुटुंबांना किराणा किटचे व शिधापत्रिकेचे वाटप आदिवासी विक...

 राहुरी(वेबटीम)


आदिवासी विकास योजने अंतर्गत राहुरी तालुक्यातील आरडगाव येथे आदिवासी कुटुंबांना किराणा किटचे व शिधापत्रिकेचे वाटप आदिवासी विकास राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांचे हस्ते करण्यात आले. 


आदिवासी विकास योजनेमार्फत सध्या खावटी किट व रोख स्वरुपात रु.2000 प्रमाणे वाटप दुसरा टप्पा सुरु झाला असुन राहुरी ही आदिवासी कुटुंबाना याचा मिळालेला आहे. आज आरडगांव येथील 30 कुटुंबाना रोख स्वरुपात रु.2000 तसेच अत्यावश्यक किराणा किटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे डॉ.तनपुरे कारखान्याचे माजी संचालक सुरेश झुगे होते. 


यावेळी मंत्री तनपुरे म्हणाले की, आदिवासी विकास खात्यामार्फत महाविकास आघाडी सरकार विविध योजना राबविल्या जात आहे. त्यामध्ये कोरोना काळात आदिवासी कुटुंबाना रोख रक्कम व किराणा किट वाटण्यात आल्या तसेच पन्हाळी पत्र्याचे वाटपही या विभागाकडुन झाले. आता 2 टप्पा सुरु असुन विविध योजना आदिवासी कुटुंबाना राबविण्यासाठी मी आदिवासी खात्याचा मंत्री म्हणुन कटीबध्द आहे. ज्या ज्या योजना राबविता येईल त्या त्या योजना राबविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. तसेच आदिवासी कुटुंबातील मुलांना व्यवस्या करण्यासाठी न्युकलेस बजेटमधुन शिबीराचे आयोजन करणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले. यावेळी आदिवासी 30 कुटुंबाना शिधापत्रिकेचे वाटप मंत्री तनपुरे यांचे हस्ते करण्यात आले.


यावेळी सरपंच कर्णा जाधव ,उपसरपंच श्रीमती कुसुमताई झुगे,सुनिल मोरे , रविंद्र आढाव ,बाळासाहेब खुळे,कैलास झुगे,सुरेश झुगे,अनिल इंगळे, जनार्दन आटोळे ,नाना म्हसे, डॉ.पोटे,भाऊसाहेब देशमुख बीडीओ गोविंद खामकर, नायब तहसिलदार श्रीमती दंडीले , ग्रामविकास अधिकारी भिगांरदिवे भाऊसाहेब आदि उपस्थीत होते. आभार जालिंदर काळे यांनी मानले. 


केंदळ खु.व केंदळ बु. तसेच पिंप्री वळण येथील आदिवासी 27 कुटुंबाना 2 टप्प्यात किराणा किटचे व शिधापत्रिकेचही वाटप करण्यात आले. यावेळी बाळासाहेब आढाव ,बाबासाहेब भोईटे ,राजेंद्र आढाव,शिवाजी आढाव,संदिप आढाव ,तंटामुतीचे अध्यक्ष धोंडीराम आढाव,मा.मंडलअधिकारी लक्ष्मण आढाव , आप्पासाहेब गुंजाळ ,सुभाष आढाव , प्रमोद तारडे ,नामदेव तारडे, आण्णा देवरे, राजेंद्र तारडे ,आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत